Ranbir Kapoor | हाॅलिवूड चित्रपटामध्ये डेब्यू करण्यावर रणबीर कपूर याचे मोठे विधान, म्हणाला की…
परंतू रणबीर किंवा आलिया यांनी मुलीचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाहीये.
मुंबई : रणबीर कपूर याच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे नाव जाहिर केले. इतकेच नव्हे तर यावेळी तिने मुलीच्या नावासोबतच त्याचा अर्थही सांगून टाकला. रणबीर आणि आलिया यांनी मुलीचे नाव राहा असे ठेवले असून यांच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. परंतू रणबीर किंवा आलिया यांनी मुलीचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाहीये.
रणबीर कपूर याने रेड सी फिल्म फॅस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रणबीरने अनेक महत्वाच्या विषयावर भाष्य केले असून आता यावर चर्चा रंगताना दिसत आहे. इतकेच नाही तर भविष्यातील काही प्लॅनही यावेळी रणबीर याने सांगून टाकले आहेत.
यावेळी रणबीर बोलताना म्हणाला की, आलिया सध्या हाॅलिवूड चित्रपटांमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार आहे. परंतू माझा असा सध्यातरी काहीच विचार नाहीये. मी पुढील काही वर्ष फक्त बाॅलिवूड चित्रपटांमध्येच काम करणार आहे.
रणबीर कपूर याने यावेळी अभिनेत्यांसोबतच दिग्दर्शक बनण्याची इच्छा व्यक्त केलीये. रणबीर म्हणाला की, माझे एक स्वप्न असून मला एक चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित करायचा आहे. मात्र, माझ्यामध्ये लिहिण्याचे धाडस खरोखरच नाहीये.
मी कायमच माझ्याकडे स्टोरी येण्याची वाट पाहतो. नक्कीच मी लेखक नाहीये…परंतू माझे विचार जेंव्हा मी इतर लोकांना सांगतो त्यावेळी मी शर्मीला होतो. हा पण मी यावर आता काम करतोय. मला चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे.
मी लगेचच चित्रपट निर्मिती किंवा दिग्दर्शित करणार नसून हे सर्व मी पुढच्या 10 वर्षांमध्ये नक्कीच करेल. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याचा शमशेरा हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.