‘ऐश्वर्यासोबत रोमँटिक सीन शूट करताना…’; बॉलिवूडच्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा!
जेव्हा ऐश्वर्यासोबत मी रोमँटिक सीन शूट करत होतो त्यावेळी मी खूप नर्व्हस झालो होतो. तसंच माझे हातही थरथर कापत होते...', अभिनेत्याचा केला मोठा खुलासा!
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. रणबीर कपूरने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसंच त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. त्याचे चाहते नेहमी त्याच्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. तर आता रणबीरनं एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आतापर्यंत रणबीर कपूरने चित्रपटांमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत रोमान्स केला आहे. तसंच त्याला इंडस्ट्रीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर सगळीकडे रणबीरच्या रिल लाईफपासून ते रिअल लाईफमधील रोमान्सच्या चर्चा नेहमीच होताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का की, रणबीरला एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना चक्क घाम फुटला होता. तसंच त्यावेळी त्याचे हातही थरथरत होते.
रणबीरने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘ए दिल है मुश्किल’च्या सेटवर जेव्हा ऐश्वर्यासोबत मी रोमँटिक सीन शूट करत होतो त्यावेळी मी खूप नर्व्हस झालो होतो. तसंच माझे हातही थरथर कापत होते. मला लाजही वाटत होती. त्यानंतर मग ऐश्वर्या मला म्हणाली की, हा एक सीन आहे यात नर्व्हस होण्यासारखं काहीही नाही.
पुढे रणबीरनं सांगितलं, ऐश्वर्यानं असं म्हणताच मी विचार केला की असा चान्स परत मिळणार नाही. कदाचित हा माझा शेवटचा चान्स असू शकतो. त्यानंतर त्यानं तो सीन चांगल्या प्रकारे केला.
रणबीरनं मुलाखतीत ही गोष्ट सांगितल्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. त्यानं ऐश्वर्याचा अपमान केल्याचं नेटकरी म्हणत होते. त्यानंतर रणबीरनं नेटकर्यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला की, ऐश्वर्या माझी फॅमिली फ्रेंड आहे. मी तिची खूप इज्जत करतो. मी तिचा अपमान कधीच करणार नाही.