Ranbir Kapoor | ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या रिलीजला अवघा 1 दिवस शिल्लक असताना रणबीर कपूरचे मोठे भाष्य…

गेल्या काही दिवसांपासून बायकॉटमुळे बाॅलिवूडचे अनेक चित्रपट फ्लाॅप गेले. काही कलाकारांनी याचे खापर लोकांवर फोडले. मात्र, आता ब्रह्मास्त्रला रिलीज होण्यासाठी अवघ्या एक दिवस शिल्लक असताना रणबीर कपूरने बायकॉटवर अत्यंत मोठे विधान केले आहे.

Ranbir Kapoor | ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या रिलीजला अवघा 1 दिवस शिल्लक असताना रणबीर कपूरचे मोठे भाष्य...
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 7:28 AM

मुंबई : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ उद्या (9 सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला येतोयं. चाहते देखील रणबीर आणि आलियाला पहिल्यांदाचसोबत बघण्यासाठी इच्छुक आहेत. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले असून याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोयं. चित्रपटाची (Movie) टीम प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट उज्जैनला महाकालच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. मात्र, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखत घोषणाबाजी केली. परिणामी रणबीर आणि आलियाला अर्ध्या रस्त्यातून परतावे लागले. नुकतेच रणबीर कपूरने बायकॉट ट्रेंडवर (Boycott) एक मोठे विधान केले.

बायकॉट ट्रेंडवर रणबीर कपूर म्हणाली की….

गेल्या काही दिवसांपासून बायकॉट ट्रेंडमुळे बाॅलिवूडचे अनेक चित्रपट फ्लाॅप गेले. काही कलाकारांनी याचे खापर लोकांवर फोडले. मात्र, आता ब्रह्मास्त्रला रिलीज होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना रणबीर कपूरने बायकॉट ट्रेंडवर अत्यंत मोठे विधान केले आहे. दोन महिन्यांपूर्वी रणबीर कपूरचा रिलीज झालेल्या शमशेरावर बोलताना रणबीर म्हणाला की, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बायकॉट ट्रेंड सुरू आहे.

चित्रपटाने फक्त 64 कोटींचा आकडा पार केला

बायकॉट ट्रेंडमध्ये मला काहीच चुकीचे वाटत नाही. जर माझा शमशेरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल गेला असेल तर याचा अर्थ असा होतो की, लोकांना तो चित्रपट आवडलेला नाहीयं. चित्रपटातील कंटेंट खास नसल्याने शमशेरा बॉक्स ऑफिस काही खास कमाल दाखू शकला नसेल. रणबीर कपूरचा शमशेरा हा चित्रपट दिग्दर्शक करण मल्होत्रा ​​यांच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त 64 कोटींचा आकडा पार केलायं.