रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी रणबीरने दिली खोटी माहिती? नेमकं काय आहे प्रकरण?

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शेवटचा चित्रपट 'शर्माजी नमकीन' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. कपूर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा त्यांचा चित्रपट पाहिला. यावेळी ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीरसुद्धा (Randhir Kapoor) उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर रणधीर कपूर असं काही म्हणाले, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी रणबीरने दिली खोटी माहिती? नेमकं काय आहे प्रकरण?
Ranbir and Randhir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 4:39 PM

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. कपूर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा त्यांचा चित्रपट पाहिला. यावेळी ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीरसुद्धा (Randhir Kapoor) उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर रणधीर कपूर असं काही म्हणाले, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. याबाबत अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला. “काकांनी शर्माजी नमकीन हा चित्रपट पाहिला आणि ते म्हणाले की, ऋषीला फोन लाव. मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याच्या कामाचं कौतुक करायचं आहे. त्याने खूप चांगलं काम केलंय आणि मला हे त्याला सांगायचं आहे”, असं ते रणबीरला म्हणत होते. रणधीर कपूर यांना डिमेंशिया (dementia) हा आजार असल्याचंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. ऋषी कपूर यांनी 29 एप्रिल 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्याआधी त्यांनी ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटात काम केलं होतं.

रणबीरच्या या मुलाखतीनंतर रणधीर कपूर यांच्या आरोग्याविषयी चर्चा होऊ लागल्या. मात्र ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रणधीर यांनी त्यांना डिमेंशिया असल्याचं स्पष्टपणे नाकारलं. तुमच्यात स्मृतिभ्रंशाची सुरुवातीची लक्षणं दिसत असल्याचं रणबीरने मुलाखतीत म्हटलंय असं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर ते हसले आणि म्हणाले, “असं काही नाहीये. मी एकदम ठीक आहे. गेल्या वर्षी मला कोविडची लागण झाली होती. पण मी पूर्णपणे बरा आहे.” मग रणबीरने असं का म्हटलं, असा प्रश्न विचारला असता ते पुढे म्हणाले, “रणबीरची मर्जी, त्याला जे म्हणायचंय तो ते म्हणू शकतो.” यावेळी रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांची आठवण काढल्याचंही नाकारलं. “मी असं काही म्हणालोच नाही. मी ठीक आहे. मी राहुल रावैलसोबत गोव्याहून परतलो आहे. आम्ही गोवा फेस्टिव्हलला हजेरी लावली होती”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ऋषी कपूर यांच्या ‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटातील काही सीन्स चित्रीत करायची राहिली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटातील उर्वरित दृश्ये पूर्ण केली. ऋषी कपूर यांचा हा चित्रपट मला खूप आवडला, अशा शब्दांत रणधीर यांनी यावेळी कौतुकसुद्धा केलं. हा चित्रपट 31 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

हेही वाचा:

‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला मोठा निर्णय

Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.