Rashmika Mandana : रश्मिका मंदानाचं #SpreadingHope; असामान्य कार्य करणाऱ्यांच्या कहाण्या करणार शेअर!

रश्मिका आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून अशा लोकांच्या कहाण्या सांगणार आहे जे आपापल्या पद्धतीनं समाजाची मदत करत आहेत. (Rashmika Mandana's #SpreadingHope; Share the stories of those who do extraordinary things!)

Rashmika Mandana : रश्मिका मंदानाचं #SpreadingHope; असामान्य कार्य करणाऱ्यांच्या कहाण्या करणार शेअर!
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 4:04 PM

मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदानानं (Rashmika Mandana) नुकतंच आपल्या सोशल मीडियाद्वारे एका उपक्रमाची म्हणजेच  ‘#SpreadingHope’ ची सुरुवात केली असून या माध्यमातून ती अशा सामान्य माणसांच्या कहाण्या जगासमोर आणणार आहे ज्यांनी कोरोनाच्या या कठीण काळात गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

रश्मिकाचा नवा उपक्रम

रश्मिकानं या उपक्रमाविषयी सांगण्यासाठी आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यामध्ये ती या कॅम्पेनच्या उद्देश्याविषयी म्हणते- या कठिण काळात आशा आणि हसू पसरवण्याचा प्रयत्न करुयात! सोबतच याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, “#SpreadingHope”

या व्हिडीओमध्ये रश्मिका म्हणते, ‘येत्या काही आठवड्यांमध्ये, मी असामान्य कार्य करणाऱ्या काही सामान्य माणसांना या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येणार आहे, अशा लोकांना ज्यांनी मला आशा दिली आहे आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. ज्यांनी मला जाणीव करुन दिली की जेव्हा आपण अशा कोणत्यातरी स्थितीशी लढत असतो, तेव्हा यानं काहीच फरक नाही पडत की आपली भाषा कोणती आहे किंवा आपण कुठे राहतो.’

फॉलोअर्ससाठी पॉजिटिव्ह मॅसेज

रश्मिका आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून अशा लोकांच्या कहाण्या सांगणार आहे जे आपापल्या पद्धतीनं समाजाची मदत करत आहेत. या आधी देखील, रश्मिका आपल्या फॉलोअर्ससाठी अनेक पॉजिटिव्ह मॅसेज आणि फोटोज शेअर करत आली आहे.

लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटांत

सध्या सुरु असलेल्या तिच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर रश्मिकाकडे सध्या 2 बॉलीवुड चित्रपट आहेत, ज्यातील एक ‘मिशन मजनू’ आणि दुसरा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘गुडबाय’ हा चित्रपट आहे.

संबंधित बातम्या

Photo: उद्धव, राज आणि जयंत पाटलांच्या शिक्षिकेच्या आश्रमाचं नुकसान; 90 वर्षीय शिक्षिका म्हणतेय, बेटा…

Photo : ‘The Family Man’चा अत्यंत खतरनाक दहशतवादी मूसा रहमान कोण?; वाचा सविस्तर

Photo : अनुपमा फेम मदालसाला मिळालं खास सरप्राईज, सेटवर कुटुंबियांची हजेरी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.