Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, अभिनेत्याच्या मॅनेजरने दिली या महिलेला धमकी?

काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकीच्या वकिलाने म्हटले होते की, आलिया यांना बेडरूममध्ये झोपण्यासही मनाई करून त्यांना बाथरुम देखील वापरू दिले जात नाहीये.

Nawazuddin Siddiqui | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, अभिनेत्याच्या मॅनेजरने दिली या महिलेला धमकी?
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:01 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणींमध्ये (Difficulties) मोठी वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले. सतत नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी ही आरोप करत आहे. इतके नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्या आईने देखील आलियावर काही आरोप केले. आता हे सर्व प्रकरण चार भीतींच्या आतमध्ये राहिले नसून ते थेट कोर्टामध्ये पोहचले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईने मोठा दावा करत म्हटले होते की, नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया नाहीये. दररोज या प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर होत असलेल्या सततच्या आरोपांमुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमध्ये संपत्तीवरून वाद असल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकीच्या वकिलाने म्हटले होते की, आलिया यांना बेडरूममध्ये झोपण्यासही मनाई करून त्यांना बाथरुम देखील वापरू दिले जात नाहीये. आलिया सिद्दीकीने अंधेरी कोर्टात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केलीये.

हे सर्व प्रकरण सुरू असतानाच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुबईमधील घरातील एका महिला कामगार असलेल्या सपना हिने देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता आणि तो तूफान व्हायरलही झाला.

सपना हिचा तो व्हिडीओ आलिया हिचे वकिल रिजवान सिद्दीकी यांनी शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सपना ही म्हणताना दिसत होती की, मी नवाजुद्दीन सरांच्या घरी अडकले आहे. मॅडम गेल्यावर सरांनी मला व्हिसा लावून दिला. माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापले जात आहेत. मला दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. मला माझ्या घरी भारतामध्ये परत जायचे आहे.

या व्हिडीओमध्ये सपना ही ढसाढसा रडताना दिसली होती. आता यावर मोठा दावा केला जात आहे. रिजवान सिद्दीकी यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या मॅनेजर हा सपना हिला धमकी देत आहे. तो तिला अप्रत्यक्षपणे सांगत आहे की, तुला तुझे पैसे आणि तिकिट दिले जाईल. परंतू तू नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याकडे काम करत नाही असे बोल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.