Rohit Shetty Net Worth: दिग्दर्शक रोहित शेट्टीची रॉयल लाईफस्टाईल; संपत्ती पाहाल तर आश्चर्यचकीत व्हाल
रोहित शेट्टी प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या नावाचं रोहित शेट्टीचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. रोहितचं हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडच्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसपैकी एक आहे. (Rohit Shetty Net Worth: Director Rohit Shetty's Royal Lifestyle; You will be amazed )
मुंबई : असं म्हणतात निर्माते नसल्यास बॉलिवूडमध्ये (Bollywood) काहीही घडू शकत नाही, जर निर्माते असतील तरच चित्रपट असतो आणि जर चित्रपट असेल तरच कलाकार असतो. बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आज भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहे. कार, पैसा, आदर, दर्जा, सर्व काही आज रोहित शेट्टीकडे आहे. ज्यामुळे तो आज बॉलिवूड इंडस्ट्रीत एक मोठं नाव आहे. तर मग आज जाणून घेऊया रोहित शेट्टीची संपत्ती किती आहे.
caknowledge डॉट कॉमच्या रिपोर्ट नुसार, रोहित शेट्टीची एकूण संपत्ती 38 मिलीयन डॉलर्स आहे. जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 248 कोटी रुपये आहे. रोहित शेट्टी प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या नावाचं रोहित शेट्टीचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. रोहितचं हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडच्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसपैकी एक आहे. टीव्ही कार्यक्रमांमध्ये त्यानं जजची भूमिकासुद्धा साकारली असल्यानं, तो टीव्ही कार्यक्रमांचं आयोजन देखील करतो. त्यानं अनेक चित्रपटांसाठी स्टंटही डिझाइन केले आहेत.
View this post on Instagram
रोहित शेट्टीनं पाहिलेत गरिबीचे दिवस
रोहित शेट्टीचे वडील एम.बी. शेट्टी हे ‘फाइटर शेट्टी’ म्हणून ओळखले जायचे, तुम्ही त्यांना बर्याच चित्रपटांमध्ये स्टंट करताना पाहिलं असेलच. रोहित पाचवीत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्याची आई रत्ना शेट्टी यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणूनही काम केलं होतं. वडिलांच्या निधनानंतर घराची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. दिवसेंदिवस दारिद्र्यामुळे घरगुती वस्तू विकाव्या लागल्या. त्यावेळी रोहितच्या घरी 4 वाहने होती. पण सर्व वाहने एकएक करून विकावी लागली. त्यानंतर रोहितनं काम करण्यास सुरवात केली आणि त्याला एका दिग्दर्शकाबरोबर इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली, तेव्हा अभिनेता फक्त 50 रुपये मिळवत असे. त्या काळात प्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहलीनं रोहितला खूप मदत केली आणि त्याला सहाय्यक दिग्दर्शकाची नोकरी दिली आणि रोहितनं खूप कष्ट केले आणि स्वत:चं आयुष्य बदलवलं.
View this post on Instagram
रोहित शेट्टीनं वयाच्या 17 व्या वर्षी पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता. यासह रोहित शेट्टी बॉलिवूडचा सर्वात महागड्या दिग्दर्शकांपैकी एक झाला आहे. असं म्हणतात की आजपर्यत त्यानं बनवलेला कोणताही चित्रपट फ्लॉप गेला नाही. ज्यामुळे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड सुरुवातीपासूनच सुपरहिट ठरला आहे. यावेळी रोहित शेट्टीही काम करत आहेत. जेथे त्याचा नवीन शो खतरों के खिलाडी टीव्हीवर दाखवण्यात येतोय. रोहित हा शो होस्ट करत आहे आणि त्यासोबतच या शोचा जज आहे.
रोहित शेट्टी दरवर्षी 36 कोटी कमातो. यासह, अभिनेता दरमहिन्याला सुमारे 3 कोटी रुपये कमावतो. निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडे मुंबईत मोठी मालमत्ता आहेत. त्यानं 2013 मध्ये नवी मुंबईत स्वत:साठी एक मोठं घर विकत घेतलं. यासह मुंबईतील अंधेरी भागातही त्याची बरीच घरे आहेत.
View this post on Instagram
रोहित शेट्टीला गाड्यांचं वेड आहे
रोहित शेट्टीकडे बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर आणि बेंझ तसेच 2 लॅम्बोर्गिनी कार आहेत. त्याच्याकडे एकूण 8 मोठी वाहनं आहेत. आज त्यानं इंडस्ट्रीत स्वत:चे नाव मोठं केलं आहे.
संबंधित बातम्या