“बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?”; सलमानच्या प्रश्नाचं रामचरणने दिलं उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता दक्षिणेतील सुपरस्टार रामचरण (Ram Charan) याने उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?; सलमानच्या प्रश्नाचं रामचरणने दिलं उत्तर
Ram Charan and Salman KhanImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:30 AM

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला होता. “दाक्षिणात्य चित्रपट आपल्याकडे खूप चालतात, पण आपले चित्रपट तिकडे का इतके चालत नाही, असा मला प्रश्न पडतो”, असं तो म्हणाला होता. यावर आता दक्षिणेतील सुपरस्टार रामचरण (Ram Charan) याने उत्तर दिलं आहे. सलमान लवकरच रामचरणे वडील आणि तेलुगू मेगास्टार चिरंजीवीसोबत एका चित्रपटात काम करणार आहे. गॉडफादर असं या चित्रपटाचं नाव आहे. एका पत्रकार परिषेदत या चित्रपटाविषयी बोलताना सलमानने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Film Industry) फरकाबद्दलचं कुतूहल व्यक्त केलं.

काय म्हणाला रामचरण?

“मला हिंदी चित्रपटसृष्टीतून असा दिग्दर्शक हवा आहे, जो संपूर्ण भारताचा विचार करून चित्रपट बनवू शकतो, ज्याच दक्षिणेचाही समावेश असेल. सलमान म्हणाला की मला राम, राजामौली आणि तारक यांचं काम खरोखर आवडतं पण दक्षिणेत आमच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद का मिळत नाही? त्याचं हे बोलणं खूपच प्रामाणिक आहे, पण मला विश्वास आहे की यात सलमानजींची किंवा काही चित्रपटांची चूक नाही. हे सर्व लेखनावर अवलंबून आहे आणि ‘हमारा चित्रपट इधर ही देखेंगे,’ (आमचा चित्रपट इथेच पाहणार) या सीमारेषा ओलांडणाऱ्या दिग्दर्शकावर अवलंबून आहे. प्रत्येक लेखकाने विजयेंद्र प्रसाद (RRR) किंवा राजामौलींसारखा चित्रपट लिहावा आणि त्यावर विश्वास ठेवावा. आणि अर्थातच मला एक भारतीय चित्रपट बनवायचा आहे ज्यात मला इथल्या (बॉलिवूड) टॅलेंटसह काम करायचं आहे. दिग्दर्शकांनीही दक्षिणेतील प्रतिभावान लोकांसोबत काम करून मोठ्या बजेटचे चित्रपट बनवावेत, असं मला वाटतं”, असं उत्तर रामचरणने दिलं.

काय म्हणाला होता सलमान?

“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा ‘हिरो’ या संकल्पनेवर खूप विश्वास आहे. चित्रपट संपल्यानंतर जेव्हा तुम्ही थिएटरमधून बाहेर पडता, तेव्हा ती भावना तुमच्या मनात राहिली पाहिजे. इथे एक-दोन लोक सोडले तर, अशा संकल्पनेवर आधारीत कोणीच चित्रपट बनवत नाहीत. आपणसुद्धा लार्जर दॅन लाइफ हिरोइस्मवरील चित्रपट पुन्हा एकदा बनवायला सुरुवात केली पाहिजे. मीसुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करतोय. चित्रपटातील हिरोची संकल्पना नेहमी कामी येते. कारण ती प्रेक्षकांना त्या कलाकाराशी जोडून ठेवते. सलिम-जावेद यांच्या वेळी आपल्याकडे अशी संकल्पना अंमलात आणली जात होती. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी यात एक पाऊल पुढे आहे. तिथला फॅन फॉलोइंग हा प्रचंड आहे”, असं सलमान म्हणाला होता.

हेही वाचा:

‘त्याने माझ्या पत्नीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला’; आयेशा टाकियाच्या पतीचा CISF अधिकाऱ्यावर आरोप

Prasad Oak: “..असं असेल तर मग मी हिंदीत का काम करावं?”; प्रसाद ओकची रोखठोक भूमिका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.