साजिद खान यांचा मृत्यू, बॉलिवूड विश्वावर शोककळा

बॉलिवूड विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार अभिनेते साजिद खान यांचा मृत्यू झाला आहे. साजिद खान यांनी वयाच्या 71 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

साजिद खान यांचा मृत्यू, बॉलिवूड विश्वावर शोककळा
Sajid Khan Passed away
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 11:17 PM

मुंबई : बॉलिवूड विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्टार अभिनेता साजिद खान यांनी वयाच्या वयाच्या 71 वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. (Sajid Khan Passed Away) ‘मदर इंडिया’ मधील सुनील दत्त यांच्या बिरजूच्या लहानपणातील भूमिका साकारली होती. बिरजू पात्राची साजिद खान यांनी छाप पाडली होती. कर्करोगाने साजिद खान यांचं निधन झाल्याची माहिती समजत आहे. याबाबत साजिद यांचा मुलगा समीर खाने याने माहिती दिली.

गेल्या काही वर्षांपासून साजिद खान कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. शुक्रवारी म्हणजेच 22 डिसेंबरला त्यांचं निधन झाल्याची माहिती समीर खान याने दिली. साजिद खान यांनी दुसरं लग्न केलं होतं त्यानंतर ते केरळमध्ये स्थायिक झाले होते. चित्रपट सृष्टीपासून ते दूर गेले होते आणि समाजहिताच्या कामात गुंतल्याचं समीर खान याने सांगितलं.

साजिद खान यांनी कमी काळ काम केलं होतं पण त्यांच्या अभिनयाची कौतुक झालं होतं. साजिद खान यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं होतं. साजिद खान यांनी मदर इंडिया या चित्रपटामध्ये सुनील दत्त यांच्या बिरजूची भूमिका साकारली होती. साजिद यांचं वय त्यावेळी अवघ 6 वर्षे होतं.  साजिद खान यांनी कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

दरम्यान, साजिद यांना सन ऑफ इंडिया या चित्रपटाने त्यांना देशातच नाहीतर जगात ओळख मिळाली होती. या चित्रपटातील त्यांनी केलेल्या कामाचंही चांगलं कौतुक झालं होतं. जिंदगी और तुफान, दहंस आणि हार्ट अँड डस्ट या चित्रपटांमध्येही साजिद यांनी काम केलं होतं.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.