कोरोनानं आयुष्य नेगेटीव्ह झालंय? सलमान खानच्या बापाची ही मुलाखत नव्यानं विचार करायला लावेल!
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे हजारो बळी जात आहेत. सरकार नवनवे निर्बंध आणत आहे. यासगळ्यात कुठेतरी सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होऊ लागला आहे.
मुंबई : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे हजारो बळी जात आहेत. सरकार नवनवे निर्बंध आणत आहे. यासगळ्यात कुठेतरी सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होऊ लागला आहे. या सगळ्या परिस्थितीला तोंड देत असताना सामान्य माणूस काहीसा नकारात्मकतेकडे झुकत चालला आहे. तुम्हालाही या वातावरणात असंच काहीस वाटत असेल, तर सलमान खानचे वडील अर्थात लेखक सलीम खान (Salim Khan) यांचा हा व्हिडीओ नक्की बघा (Salim Khan interview will give you a positive vibe).
आयुष्य म्हणजे काय? आपण ते कसं जगावं आणि त्याला कसं सामोरं जावं, हे जाणून घ्यायचं असेल तर, सलीम खान यांचे हे शब्द नक्की ऐकले पाहिजेत. आयुष्य केवळ चौकटीत न बांधता त्यातील पैलू उलगडून जगता आलं पाहिजे, याबद्दल सलीमजींनी स्वतःचे काही अनुभव शेअर करत सांगितले आहे.
पाहा सलीम खान यांची मुलाखत
मुलं मोठी झाली की जगू हा विचार डोक्यात होता!
सलीम खान म्हणतात की, ‘मी नेहमी विचार करायचो की मुलं मोठी होतील, ती स्थिरस्थावर होतील. मुलं मार्गी लागली की आपण छान फिरू, आयुष्य जगू, असा विचार मी केला होता. पण जेव्हा पाच मुलं पदरी पडली तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी पाचपट काम करावं लागलं. सगळ्या गोष्टींसाठी मुलं माझ्यावर अवलंबून होती. मग त्यावेळी मला माझं काम थांबवावं लागत होतं. आताही त्यांना माझी तितकीच गरज असते. त्यामुळे तो वेळ मी त्यांना देतो.’(Salim Khan interview will give you a positive vibe)
चूक करणं ही चूक नाही!
पुढे सलीम खान म्हणतात, ‘आयुष्यात चुका केल्याच पाहिजेत. माझ्या मुलांनीही केल्या, पण मी त्यांना समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. त्यांच्या चुकातून त्यांना शिकू दिलं. चूक करणं ही चूक नाही, तर चूक न करणं ही चूक आहे. कारण चुकांमधून आपण शिकतो. मात्र, तीच तीच चूक पुन्हा पुन्हा करणं मात्र मोठी चूक आहे, जी आपण टाळली पाहिजे.
आयुष्य आपल्या हातात नाही, जे घडतंय ते घडू द्या…
या व्हिडीओच्या 37व्या मिनिटाला सलीमजींनी चक्क रुमालाचा आधार घेऊन आयुष्याचं गणित समजावून सांगितलं आहे. या वेळी सलीमजी हातात रुमाल पकडून म्हणतात, आपलं आयुष्य या रुमालाच्या टोकाप्रमाणे आहे. जन्म आणि मृत्यू या रुमालाच्या दोन बाजू आहेत. ना जन्म आपल्या हातात आहे ना मृत्यू…आपण दोन्ही गोष्टीं आपल्या मनाप्रमाणे ठरवून करू शकत नाही. यातील एखादी जरी गोष्ट आपल्या हातात असती, तर मात्र चित्र वेगळं असतं. मात्र, जर या दोन्ही गोष्टी आपण मनाप्रमाणे करू शकत नाही तर, मधल्या इतर गोष्टी का? मधल्या काळातही आपण शांत बसून नाही राहू शकत, कारण जे व्हायचं ते होतंच! म्हणून जे घडतंय ते घडू द्या!
(Salim Khan interview will give you a positive vibe)
हेही वाचा :
Puglya : मराठी सिनेमाचा ‘मॉस्को’त डंका, ‘पुगल्या’ला सर्वोत्तम पुरस्कार
RRR New Poster | ‘आरआरआर’चे नवे पोस्टर प्रदर्शित, रामचरण-ज्युनिअर एनटीआरला एकत्र पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला!#RRRMovie | #RRR | #RamCharan | #JuniorNTR | #Bollywood https://t.co/kvgq83YQjw
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 13, 2021