Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

सलमान खान(Salman Khan)ला साप (Snake)चावला. सापाला पाहून सलमानला मात्र घाम फुटला होता. मदत करा म्हणून तो फोनवर जोरजोरात ओरडला. सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊस(Salman Khan Farm House Panvel)वर असताना ही घटना घडली.

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?
सलमान खान
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 3:45 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan)बद्दलची धक्कादायक बातमी समोर आलीय. काल रात्री सलमान खानला साप (Snake)चावला. सापाला पाहून सलमानला मात्र घाम फुटला होता. मदत करा म्हणून तो फोनवर जोरजोरात ओरडला. सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊस(Salman Khan Farm House Panvel)वर असताना ही घटना घडली. मात्र, सध्या सलमानची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या प्रकारानंतर रात्री उशिरा त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

M.G.Mमध्ये उपचार 25 डिसेंबरची रात्र सलमान खानसाठी नक्कीच चांगली नव्हती. काल रात्री सलमान सापाच्या कचाट्यात सापडला होता. पनवेलच्या फार्म हाऊसवर हा प्रकार घडला. सापानं दंश केल्याबरोबर त्यानं मदतीसाठी ओरड केली, फोन केला. त्यामुळे उशीर होण्यापूर्वी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सलमान उपचारासाठी नवी मुंबईच्या कामोठेतल्या M.G.Mमध्ये नेण्यात आलं.

मदतीसाठी आरडाओरड सलमान खान पनवेल फार्म हाऊसवर मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होता. त्यांच्याशी बोलत असताना, त्याच्या लक्षात आलं, की आपल्या हाताला काहीतरी टोचतंय. त्यानं इकडे-तिकडे नजर फिरवली तेव्हा त्याला साप दिसला. सापाला पाहून सलमान खान घाबरला आणि त्यानं लगेच मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. रात्री साडे तीन वाजताच ते हॉस्पिडलमध्ये पोहोचले. सुमारे 6 ते 7 तास रुग्णालयात राहिल्यानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

घनदाट जंगलात आहे फार्महाऊस सलमान खानचं फार्म हाऊस खूप मोठं आहे, त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. त्याला याआधीही फार्म हाऊसजवळ साप दिसला होता. फार्म हाऊसच्या केअरटेकरनाही काळजी घेण्याच्या सूचना त्यानं आधी केल्या होत्या. मात्र सापानं त्याला दंश केलाच. सुदैवानं हा साप विषारी नव्हता. दरम्यान, आता सलमान धोक्याबाहेर असून त्याला बरं वाटत आहे.

फार्म हाऊसवर दाखल MGMच्या डॉक्टरांची टीम  सलमान खानच्या फार्म हाऊसवर MGMच्या डॉक्टरांची टीम दाखल झाली. सकाळी सलमानला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता चेकअपसाठी एक टीम अर्पिता फार्म हाऊसवर दाखल झाली.

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…

Nick Jonas Christmas : ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये निक जोनास रोमँटिक, मांडीवर बसवून प्रियंका चोप्राला ‘Kiss’

Kapoor Family Christmas : कपूर फॅमिलीचं ख्रिसमस सेलिब्रेशन, रणबीर-आलिया मात्र गैरहजर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.