AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan| भाईजान लग्न करेना अन् चर्चा काही थांबेना! सलमान आणि सोनाक्षीचा शुभविवाह? मग काय आहे ‘त्या’ फोटोमागचं सत्य?

अभिनेता सलमान खान काही लग्न करेना आणि लग्नाच्या चर्चा कही खांबेना. आता पुन्हा एकदा भाईजानच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रियाही चांगल्याच रंजक आहे. कारण, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानचा हटके लूक असलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. त्यामध्ये सलमान आणि सोनाक्षीचा लूक हा पूर्णपणे वेडिंगचा आहे. सलमान खान सोनाक्षीला अंगठी घालत असून या फोटोत सोनाक्षी आणि सलमानची जोडी चाहत्यांना भुरळ घालते आहे.

Salman Khan| भाईजान लग्न करेना अन् चर्चा काही थांबेना! सलमान आणि सोनाक्षीचा शुभविवाह? मग काय आहे 'त्या' फोटोमागचं सत्य?
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:21 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) काही लग्न करेना आणि लग्नाच्या चर्चा कही खांबेना. आता पुन्हा एकदा भाईजानच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रियाही चांगल्याच रंजक आहे. कारण, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinh) आणि सलमान खानचा हटके लूक असलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. त्यामध्ये सलमान आणि सोनाक्षीचा लूक हा पूर्णपणे वेडिंगचा आहे. सलमान खान सोनाक्षीला अंगठी घालत असून या फोटोत सोनाक्षी आणि सलमानची जोडी चाहत्यांना भुरळ घालते आहे. विशेष म्हणजे या व्हायरल होणाऱ्या फोटोवर सोनाक्षी सिन्हानं प्रतिक्रिया दिली आहे.

फेक फोटोवर सोनाक्षी काय म्हणाली?

अभिनेता सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा वेडिंगचा फोटो व्हायरल झाल्यानं चर्चा तर रंगणारच ना. कारण भाईजानच्या लग्नाची चर्चा काही नवी नाही. यापूर्वी देखील सलमान खानच्या लग्नाच्या फेक बातम्या सोशल मीडियावर आल्या आहे. आता सलमान आणि सोनाक्षीच्या व्हायरल फोटोवर खुद्द सोनाक्षी सिन्हानं प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीनं एक पोस्ट करुन लिहीलं, तुम्ही मुर्ख आहात का? खऱ्या आणि खोट्या फोटोमध्ये तुम्ही साधा फरकही नाही करू शकत. सोनाक्षीनं तिच्या या दोन ओळीसोबत एक हसणारा इमोजी देखील टाकला आहे. आता सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया तर आली. मात्र, भाईजान या फेक फोटोवर कधी प्रतिक्रिया देणार आणि काय प्रतिक्रिया देणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

फोटो व्हायरल केला जातोय

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा हा फेक वेडिंग फोटो खूप व्हायरल केला जात आहे. या फोटोमध्ये सलमान खाननं पांढरा शर्ट आणि जॅकेट घातलं आहे. तर सोनाक्षी सिन्हानं लाल रंगाची साडी घातल्याच दिसत आहे. या फोटोमध्ये सोनाक्षीला सलमान अंगठी घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीचा आनंद या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. आता हे सगळं असलं तरी या फोटोकडे बघितल्यास लगेच कळतं की या फोटोला एडिट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by @gossipsbtown

यापूर्वीही लग्नाच्या चर्चा

अभिनेता सलमान खानचं यापूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, ऐश्वर्या राय या अभिनेंत्रीसोबत नाव जोडण्यात आलं आहे. लवकरच सलमानचा टायगर -3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या दबंग, बजरंगी भाईजान,अंतिम-द फायनल ट्रुथ, मैने प्यार किया, एक था टायगर, टायगर जिंदा है, या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आता सोशल मीडियावर व्हायर होणाऱ्या फोटोमागे काही वेगळा फंडा तर नाही ना, अशाही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर येतायेत. आता सलमान आणि सोनाक्षीच जाणे, काय खरं अन् काय खोटं.

इतर बातम्या

अमिताभ बच्चन यांनी ‘झूंड’चं एक दिवसही प्रमोशन का केलं नाही? चर्चांना उधाण, चांगला पिक्चर रखडतोय?

Allu Arjun | ‘पुष्पा’स्टार अल्लू अर्जुनकडून गेला ‘आइकन’, काय आहे चित्रपट गमावण्याचं कारण, अल्लू अर्जुन सध्या काय करतोय!

Aai Kuthe Kay Karte: ‘अरुंधती सिंड्रोम’मुळे देशमुखांचं घर पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, कांचनबाईंच्या भीतीला संजना दीक्षित खतपाणी घालणार?

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.