Salman Khan: “मैंने प्यार किया चित्रपटानंतर 6 महिने मला काम मिळत नव्हतं”; IIFA पुरस्कार सोहळ्यात सलमानचे डोळे पाणावले

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून सलमानने पहिल्यांदा काम केलं होतं. तर भाग्यश्रीने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटाने त्यावेळी सर्वाधिक कमाई केली होती.

Salman Khan: मैंने प्यार किया चित्रपटानंतर 6 महिने मला काम मिळत नव्हतं; IIFA पुरस्कार सोहळ्यात सलमानचे डोळे पाणावले
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 4:26 PM

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स (IIFA) हा पुरस्कार सोहळा नुकताच अबुधाबीमध्ये पार पडला. बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानने (Salman Khan) या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. यावेळी फिल्म इंडस्ट्रीतील स्ट्रगल आठवताना सलमानचे डोळे पाणावले. ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या सुपरहिट चित्रपटानंतर काम मिळत नव्हतं, असं सलमानने यावेळी सांगितलं. चित्रपटाच्या यशाचं संपूर्ण श्रेय अभिनेत्री भाग्यश्रीला मिळाल्याने सलमानला त्यावेळी फारसे ऑफर्स मिळत नव्हते. अशा वेळी आपलं करिअर वाचवल्याबद्दल त्याने दिग्दर्शक रमेश तौरानी यांचे आभार मानले. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून सलमानने पहिल्यांदा काम केलं होतं. तर भाग्यश्रीने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटाने त्यावेळी सर्वाधिक कमाई केली होती. मात्र भाग्यश्रीने हिमालय दासानीशी लग्न कऱण्यासाठी या चित्रपटानंतर बॉलिवूडला रामराम केला.

‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान सलमान म्हणाला, “मैंने प्यार किया हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भाग्यश्रीने पुढे काम करण्यास नकार दिला होता, कारण तिला लग्न करायचं होतं. भाग्यश्री चित्रपटाचं संपूर्ण श्रेय घेऊन गेली. त्यानंतर सहा महिने, माझ्या हातात एकही चित्रपट नव्हता. त्यावेळी देवाप्रमाणे रमेश तौरानी हे माझ्या मदतीला धावून आले. त्यावेळी माझ्या वडिलांनी 2000 रुपये देऊन निर्माते जीपी सिप्पी यांना फिल्म इंडस्ट्रीच्या मासिकात त्यांनी मला एका चित्रपटासाठी साईन केल्याची खोटी घोषणा करायला लावली. जीपी यांनी तसं केलं, पण त्यावेळी कोणताच चित्रपट त्यांनी माझ्यासोबत साईन केला नव्हता. रमेश तौरानी यांनी सिप्पी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चित्रपटाच्या संगीतासाठी पाच लाख रुपये दिले. त्या 5 लाख रुपयांमुळेच मला ‘पत्थर के फूल’ हा चित्रपट मिळाला. धन्यवाद!”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

या भावनिक आठवणी सांगताना सलमानने आणखी एक किस्सा सांगितला. एका दुकानातील शर्ट आणि पाकिट सलमानला खूप आवडलं होतं, पण पुरेशा पैशांअभावी तो ते विकत घेऊ शकला नव्हता. मात्र सुनील शेट्टी यांनी सलमानला तोच शर्ट आणि तेच पाकिट भेटवस्तू म्हणून दिलं होतं. 2008 मध्ये वाँटेडसारख्या चित्रपटाची ऑफर देऊन पुन्हा करिअर सावरल्याबद्दल त्याने निर्माते बोनी कपूर यांचे आभार मानले आणि त्यांना मिठी मारली.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.