असे नेमके काय घडले की, चक्क दबंग खानच्या आईने बिग बॉस पाहणे केले बंद, वाचा
दरवेळी प्रमाणे यंदाही बिग बॉसचे हे सीजन हीट ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉस 16 ला होस्ट सलमान खान करणार आहे.
मुंबई : बिग बॉस 16 च्या पत्रकार परिषदेत अभिनेता सलमान खानने (Salman Khan) अनेक मोठे खुलासे केले आहेत. बिग बॉसचे 16 वे सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार हे अजून पुर्णपणे स्पष्ट झाले नाहीये. मात्र, काही स्पर्धकांचे प्रोमो (Promo) शेअर करण्यात आले आहे. दरवेळी प्रमाणे यंदाही बिग बॉसचे हे सीजन हीट ठरणार असल्याचे सांगितले जातय. बिग बॉस 16 ला होस्ट सलमान खान करणार आहे. बिग बॉस 16 च्या पत्रकार परिषदेमध्ये सलमान खानने अनेक मोठे खुलासे केले आहेत.
पत्रकार परिषदेच्या वेळी सलमान खानला विचारण्यात आले की, तुमची आई बिग बॉस शोची खूप मोठी फॅन आहे…त्यावर बोलताना सलमान खान म्हणाला की, माझी आई अगोदर बिग बॉस बघायची पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या आईने बिग बॉस बघणे बंद केले आहे…
सलमान पुढे म्हणाला की, ती आता इतर शो बघते. सलमान खानचे हे उत्तर ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसलाय. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या काही स्पर्धकांवरून सलमान खानने हा कानमंत्र शोच्या मेकर्सला दिलाय.
बिग बॉस हा शो अधिक मनोरंजक बनवण्याची गरज असल्याचे सलमान खानला वाटत आहे. यावेळी निर्मात्यांनी सलमान खानला वादा केला की, यावेळेचे बिग बॉसचे सीजन नक्कीच अधिक खास करू…
बिग बॉस 15 मध्ये टीव्हीवरील मोठे स्टार सहभागी झाले होते. मात्र, टीआरपीमध्ये बिग बॉस 15 ला काही खास करण्यात यश मिळाले नाही. बिग बॉस 15 मध्ये शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी सहभागी झाली होती. त्यावेळी बिग बॉसच्या मेकर्सवर अनेक आरोप करण्यात आले होते.