Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आज महात्मा गांधीं यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला. लाडक्या ‘भाईजान’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात
Salman Khan at Sabarmati
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 5:03 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने आज महात्मा गांधीं यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी सलमानने चक्क बापूंचा चरखाही चालवला. लाडक्या ‘भाईजान’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

यावेळी सलमानने हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. आश्रमाला भेट देऊन निघताना सलमानने व्हिजिटर बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला. त्याने लिहिले की, ‘मला इथे यायला खूप आवडले आणि हा आनंद मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदाच अशा ठिकाणी फिरायला मिळाले आहे. मला या आश्रमात पुन्हा यायला आवडेल.’

पाहा व्हिडीओ :

‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी अहमदाबाद दौरा!

‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अहमदाबादला आलेल्या सलमानची एक झलक पाहण्यासाठी आश्रमातही त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सलमान केवळ 10 ते 15 मिनिटे साबरमती नदीच्या काठावरील ‘साबरमती’ आश्रमात थांबला होता. स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य केंद्र असलेल्या या ऐतिहासिक ठिकाणी वसलेले महात्मा गांधीजींचे निवासस्थान असलेले ‘हृदय कुंज’लाही त्याने यावेळी भेट दिली.

आश्रमाच्या व्हरांड्यात बसून त्याने चरख्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला. हा तोच चरखा आहे ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुखांनी सूत कातले आहे. आश्रमाने त्यांच्या परंपरेनुसार सलमानचे स्वागत करताना कापसाचा हार घालण्यात आला. सलमानने देखील त्यांच्या खास शैलीत तो हार हाताला गुंडाळला.

बॉक्स ऑफिसवरही चांगला गल्ला

‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटासाठी सलमान खान आणि आयुष शर्मा यांना समीक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात सलमान खानचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची अ‍ॅक्शन प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही त्याचा फायदा होताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 4.5 कोटींची कमाई केली होती. आता वीकेंडच्या अखेरीस या चित्रपटाने जवळपास 18 कोटींचा व्यवसाय केला आहे.

आयुष शर्माच्या ‘अंतिम’मध्ये सलमान खान सेकंड लीडमध्ये दिसत आहे. पण, त्याच्या निर्मात्यांनी या चित्रपटांमध्ये त्याच्या उपस्थितीचा फायदा घेतला आहे. BoxofficeIndia.com च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4.5 कोटींच्या कमाईने सुरुवात केली आहे. यानंतर, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5.50 कोटींची कमाई केली. मात्र, रविवारी चित्रपटाच्या कमाईत 40% वाढ झाली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7.50-7.75 कोटींचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा :

‘Pushpa : The Rise’मध्ये समंथा प्रभूचा ‘आयटम नंबर’, अल्लू अर्जुनसोबत जमणार जोडी!

Chaka Chak Song Out | धनुषसह सारा अली खानचा देसी अंदाज, ‘अतरंगी रे’चे ‘चका चक’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.