BTS Video | समंथा प्रभूची आयटम साँगसाठी प्रचंड मेहनत, ‘Oo Antava’चा हा रिहर्सल व्हिडीओ पाहिला का?

‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu), अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) मधील तिच्या ‘ओओ अंटवा ओओ ओओ अंटवा’ या डान्स नंबरसाठी खूप प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवत आहे.

BTS Video | समंथा प्रभूची आयटम साँगसाठी प्रचंड मेहनत, ‘Oo Antava’चा हा रिहर्सल व्हिडीओ पाहिला का?
Samnatha Ruth Prabhu
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 3:56 PM

मुंबई : ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu), अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) मधील तिच्या ‘ओओ अंटवा ओओ ओओ अंटवा’ या डान्स नंबरसाठी खूप प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळवत आहे. नुकताच, अभिनेत्रीने सेटवरून एक BTS व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने आणि तिच्या नृत्यदिग्दर्शक टीमने या गाण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाची झलक दिसली.

समांथाने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. “हा माझ्या तालीमीचा एक छोटासा भाग आहे. बर्‍याचदा आपण ज्या गोष्टींचा इतका सराव करतो, ते पडद्यावर येत नाही आणि या आश्चर्यकारक व्हिडीओमध्ये त्याची एक छोटीशी झलक आहे, जी शिकायला मला खूप मजा आली,” असे तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

पाहा व्हिडीओ :

यात समंथा आणि काही कोरिओग्राफर एका स्टुडिओमध्ये गाण्याच्या काही मूव्ह्सची रिहर्सल करताना दिसत आहेत. थकलेली आणि घामाने डबडबलेली समंथा मग ते रेकॉर्ड करत असलेल्या कॅमेर्‍याकडे जाते आणि ती कोरिओग्राफरकडे बोट दाखवत गंमतीने म्हणते ‘ते मला मारतीलच आता’. ती नंतर तिच्या जागेवर परत जाते आणि हसत म्हणते की, “त्यांच्याकडे पहा. त्यांना घामही येत नाही आणि ते माझ्याकडे बघतात.” व्हिडीओच्या शेवटी, जेव्हा कोणीतरी कॅमेरा ऑफ समंथाला विचारते की, ” तू किती थकली आहेस, 1 ते 100मध्ये उत्तर दे”. यावर ती उत्तर देते, “100!”

करिअरमधला पहिला आयटम नंबर!

या गाण्यात समंथाच्या तिच्या करिअरमधला पहिलाच आयटम नंबर केला आहे. डिसेंबरमध्ये एका कार्यक्रमात, चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याने समंथाचे आभार मानले होते. “समंथा प्रभू, या गाण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माहीत आहे, सेटवर तुला किती शंका होत्या. ते बरोबर असो वा नसो. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगितली, माझ्यावर विश्वास ठेवा आणि डान्स करा. यानंतर तुम्ही एक प्रश्नही विचारला नाही,” असे तो म्हणाला होता. अल्लूच्या कमेंटचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना समंथाने लिहिले, “आणि मी नेहमी तुझ्यावर @alluarjun विश्वास ठेवीन.”

समंथा यावर्षी तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्याची सुरुवात विजय सेतुपती सोबतच्या ‘काथु वाकुला रेंडू कादल’ या तमिळ चित्रपटापासून होणार आहे. ती ‘शाकुंतलम’ आणि ‘यशोदा’ या तेलगू चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.