‘व्हेकेशन मूड’, बिकिनी परिधान करून ‘संजू बाबा’ची लाडकी त्रिशाला जंगलात डायनासोरच्या शोधात!

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची लाडकी लेक त्रिशाला दत्त (Trishala Dutt) सध्या हवाईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. आपल्या बोल्ड अवताराने चर्चेत आलेली त्रिशालाने पुन्हा एकदा तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘व्हेकेशन मूड’, बिकिनी परिधान करून ‘संजू बाबा’ची लाडकी त्रिशाला जंगलात डायनासोरच्या शोधात!
त्रिशाला दत्त
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 12:38 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची लाडकी लेक त्रिशाला दत्त (Trishala Dutt) सध्या हवाईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. आपल्या बोल्ड अवताराने चर्चेत आलेली त्रिशालाने पुन्हा एकदा तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्रिशाला एक अप्रतिम कॅप्शन लिहिले आहे.

त्रिशालाचा फोटो

त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अलीकडेच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या पाठीमोऱ्या मुद्रेत घेतला गेला आहे. या फोटोमध्ये तिचे घनदाट, सुंदर काळे केस स्पष्ट दिसत आहेत आणि तिने हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. फोटो शेअर करताना त्रिशला हिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी तुम्हाला 66 दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोरच्या शोधात घेऊन जात आहे.’

पाहा त्रिशालाची पोस्ट

Trishala 1

त्रिशालाची पोस्ट

अमेरिकेत राहते त्रिशाला

इतर स्टार किड्स प्रमाणे, त्रिशाला दत्तने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट अद्याप सार्वजनिक केले नाही. पण, तरीही तिचे चांगले फॉलोअर्स आहेत. 33 वर्षीय त्रिशाला सध्या अमेरिकेत राहते आणि पेशाने मानसोपचारतज्ज्ञ आहे. अलीकडेच तिने तिचा एक बिकिनी फोटो शेअर केला आहे, ज्यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे.

संजय दत्तची ‘लाडाची लेक’

संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्मा पासूनची मुलगी त्रिशाला दत्त आहे. संजयने 1987मध्ये अभिनेत्री रिचा शर्माशी लग्न केले होते, पण लग्नाच्या केवळ 9 वर्षानंतर ब्रेन ट्यूमरमुळे तिचा मृत्यू झाला. त्रिशलाचा जन्म 1988मध्ये झाला होता आणि तिच्या आईचे निधन झाले तेव्हा, ती फक्त 8 वर्षांची होती. त्रिशला दत्त, संजय दत्त आणि रिचा शर्मा यांची मुलगी आहे. रिचा शर्माने ‘हम नौजवान’, ‘अनुभव’, ‘इन्साफ की आवाज’ आणि ‘सडक छाप’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सावत्र आईशी चांगले संबंध

त्रिशाला दत्तचेही तिची सावत्र आई मान्यता दत्तसोबत चांगले संबंध आहेत. त्रिशाला सोशल मीडियावर संपूर्ण कुटुंबासोबत फोटो शेअर करत राहते.

(Sanjay Dutt’s Daughter Trishala Dutt share Bikini photo on social with cute caption)

हेही वाचा :

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील हंगाम्याला भोजपुरी तडका लागणार, ‘या’ अभिनेत्रीची ग्रँड एंट्री होणार!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.