Sara Ali Khan Janhvi Kapoor workout | सारा अली खान, जान्हवी कपूर हॉट अँड स्लिम का दिसतात ?, ‘हा’ व्हिडीओ पाहाच

सारा अली खान आणि जान्हवी कपूर स्वत:ला फिट कसं ठेवतात, त्यासाठी त्या किती परिश्रम घेतात हे त्यांनी एका व्हिडीओमध्ये दाखवलं आहे. (sara ali khan janhvi kapoor workout)

Sara Ali Khan Janhvi Kapoor workout | सारा अली खान, जान्हवी कपूर हॉट अँड स्लिम का दिसतात ?, 'हा' व्हिडीओ पाहाच
SARA ALI KHAN JANHVI KAPOOR
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 11:53 PM

मुंबई : बॉलिवूड जगतातील अनेक अभिनेत्यांचं कसदार, पिळदार शरीर तसेच अभिनेत्र्यांची हॉट, स्लिम अँड फिट शरिरयष्ठी पाहून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. त्यांनी एवढं आकर्षक शरिर कसं कमवलं याचं आपल्याला नेहमीच कुतूहल असतं. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor) या यापैकीच एक. दोघींचे सौदंर्य अनेकांना घायाळ तर करतंच पण त्यांनी मेन्टेन केलेलं शरिरसुद्धा अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. या अभिनेत्र्या स्वत:ला कसं घडवत असतील हे अनेकांना एक कोडं असल्यासारखं वाटतं. मात्र, हेच कोडं आता लाखो दिलोंकी धडकन असलेल्या खुद्द सार अली खानने उलगडून दाखवलं आहे. ती आणि जान्हवी कपूर स्वत:ला फिट कसं ठेवतात, त्यासाठी त्या किती परिश्रम घेतात हे त्यांनी एका व्हिडीओमध्ये दाखवलं आहे. (Sara Ali Khan posted video on Instagram in which Sara and Janhvi Kapoor doing exercise workout looking beautiful)

सारा, जान्हवीचं वर्कआऊट

सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर व्यायाम करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघीसुद्धा आकर्षक अशा GYM Outfit मध्ये आहेत. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय काय करावं हे त्यांनी या व्हिडीओमध्ये आणि कॅप्शनच्या माध्यमातून सांगितलं आहे. Front Kicks with Squat, Donkey kick, Dumbbell Romanian deadlift असे विविध व्यायामाचे प्रकार करताना त्या दिसतायत. हा व्यायाम करताना त्यांचं डेडिकेशन पाहण्यासारखं आहे.

सारा, जान्हवी चांगल्या मैत्रिणी

या व्हिडीओमध्ये सारा आणि जान्हवीचे डेडिकेशन तर दिसत आहे. साराने हा व्हिडीओ पोस्ट करताना काव्यात्मक असे कॅप्शन लिहले आहे. अशा प्रकारे वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही सोन्यासारखी चमक मिळवू शकाल असं तिनं म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

दरम्यान, सारा आणि जान्हवी या दोघींची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. वेगवेगळ्या फंक्शनमध्ये त्या अनेकवेळा एकत्र दिसल्या आहेत. तसे फोटो त्या आपल्या इन्स्टाग्राम अकाडऊंटवरुन हमखास शेअर करत असतात. सध्या साराने शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये खास ठरतोय. आतापर्यंत या दोघींच्या सौंदर्याने घायाळ होणारे अनेकजण त्यांच्या मेहनतीचंसुटद्धा तोंडभरुन कौतुक करत आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आपल्यावर अनेक निर्बंध आहेत. बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांकडून व्यायाम करा, पौष्टिक अन्न खा असे सल्ले दिले जातायत. सारा आणि जान्हवीचे हे वर्कआऊट पाहून अनेकांनी आपणही असाच व्यायाम करणार असल्याचं सांगितलं आहे.

इतर बातम्या :

Photo : काजोल-अजयची लेक 18 वर्षाची झाली हो…

Photo : बिग बॉस 14 विजेत्या रुबीना दिलैकचा सोशल मीडियावर जलवा, ग्लॅमरस फोटो शेअर

Photo : प्राजक्ता माळीचा धमाकेदार अंदाज, फोटो पाहाच

(Sara Ali Khan posted video on Instagram in which Sara and Janhvi Kapoor doing exercise workout looking beautiful)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.