क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं समीकरण खूप जुनं आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील सेलिब्रिटी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चर्चा तर होणारच! नुकतंच अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन गिलसोबत (Shubman Gill) पाहिलं गेलं. एका रेस्टॉरंटमध्ये हे दोघं एकत्र होते आणि त्याचा व्हिडीओ चाहतीने टिकटॉकवर (TikTok) शेअर केला आहे. टिकटॉकर उझ्मा मर्चंटने हा व्हिडीओ शेअर केला असून त्यात सारा आणि शुभमन हे एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी साराने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला असून शुभमनने पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या दोघांच्या बाजूला रेस्टॉरंटचा वेटर त्यांची ऑर्डर घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताच दोघांच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला.
‘क्या चक्कर है? (नेमकं काय शिजतंय?)’, असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला. तर सारा या नावावरूनही नेटकऱ्यांनी शुभमनची फिरकी घेतली. कारण याआधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडलं गेलं होतं. ‘क्रिकेटरच्या मुलीपासून ते क्रिकेटरच्या नातीपर्यंत..’ अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. तर मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांची ती नात आहे. 2017 मध्ये तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘सिम्बा’, ‘लव्ह आज कल’, ‘अतरंगी रे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
Shubman gill date sara ali khan ko kar eha tha aur hum kisi aur hi sara ko lapet rhe the?#Shubmangill #CricketTwitter pic.twitter.com/oEAAXqXgOz
— Arun (@ArunTuThikHoGya) August 29, 2022
याआधी साराचं नाव सुशांत सिंह राजपूत आणि कार्तिक आर्यन यांच्याशीही जोडलं गेलं होतं. 2018 मध्ये जेव्हा साराने ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती, तेव्हा तिने कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचा खुलासा केला होता. ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2020 मध्ये कार्तिक आणि साराचं ब्रेकअप झालं. दुसरीकडे शुभमन गिलने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचे दोन पुरस्कार जिंकले होते. त्याने आतापर्यंत 11 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.