माझ्या पतीचे नाव घेऊ नका, सतीश कौशिक यांच्या पत्नीने सुनावले खडेबोल, सर्व आरोप बिनबुडाचे
सतीश कौशिक यांनी 9 मार्चला जगाचा निरोप घेतला आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आता सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनेक खळबळजनक खुलासे होताना दिसत आहेत.
मुंबई : सतीश कौशिक यांच्या निधनानंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांनी 9 मार्च रोजी जगाचा निरोप घेतलाय. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर बाॅलिवूड विश्वावर शोककळा पसरलीये. प्रत्येकजण सतीश कौशिक यांना मिस करताना दिसत आहे. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, माझ्यासाठी हे दिवस खूप जास्त कठीण आहेत. कारण माझी आणि सतीश कौशिकची मैत्री ही तब्बल 45 वर्षांची होती. आम्ही अनेक स्वप्ने सोबत बघितली आणि ती पुर्ण करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर तुटलेले दिसत आहेत.
सतीश कौशिक यांच्या अत्यसंस्कारवेळी ढसाढसा रडताना अनुपम खेर दिसले. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र विकास मालू यांची दुसरी पत्नी सान्वी ही सतत गंभीर आरोप करताना दिसत आहे. विकास मानू यानेच सतीश कौशिक यांना मारले असल्याचे थेट सान्वी हिने म्हटले आहे. यासोबतच तिने गंभीर आरोप केले आहेत.
सतीश कौशिक हे विकास मालू यांच्याच दिल्ली येथील फॉर्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेले होते आणि तिथेच पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधे सापडली. इतकेच नाहीतर सान्वी म्हणाली की, माझ्या पतीने दुबई येथे एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा आणि सतीश कौशिक होते.
सान्वी हिने केलेल्या दाव्यानंतर सर्वांनाच मोठा झटका बसलायं. आता सतीश कौशिक यांची पत्नी शशी कौशिक यांनी सान्वीच्या दाव्यावर मोठे विधान करत थेट म्हटले आहे की, या प्रकरणात माझ्या पतीचे नाव घेऊन नका. इतकेच नाहीतर विकास मालूच्या सपोर्टमध्ये बोलताना शशी कौशिक या दिसल्या.
शशी कौशिक म्हणाल्या की, विकास मालू हे खूप श्रीमंत आहेत आणि मला वाटतं नाही की त्यांनी सतीश कौशिक यांना मारले असावे. सतीश कौशिक यांचे खूप चांगले मित्र विकास मालू हे आहेत. जर पैशांचा काही विषय असता तर मला नक्कीच सतीश कौशिक यांनी याबद्दल काही सांगितले असते. मला वाटते की, सान्वीला विकास मालू यांच्याकडून काही पैसे काढायचे आहेत आणि त्यामुळे ती हे सर्व करत आहे.
सतीश कौशिक आणि विकास मालू हे इतके चांगले मित्र होते की ते कधीच भांडणे करू शकत नाहीत. यावेळी शशी कौशिक म्हणाल्या की, पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. त्यामध्ये 98 टक्के ब्लॉकेज आहेत. ड्रग्सचे कोणतेच पुरावे नाहीत किंवा रिपोर्टमध्ये त्याचा साधा उल्लेख देखील नाहीये. पोलिसांनी सर्वकाही तपास केलाय. मला कळतच नाही की, ड्रग आणि मर्डरचा विषय नेमका येतोच कुठे? मला खरोखरच माहिती नाही की, माझ्या पतीच्या निधनानंतर या प्रकरणात त्यांचे नाव का घेतले जात आहे