Sohali Khan Divorce: घटस्फोटाआधीच सोहैल खानच्या पत्नीचं मोठ पाऊल, ‘खान’ आडनाव काढलं

जवळपास 24 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीमा आणि सोहैल (Sohail Khan) वेगवेगळे राहतायत. नुकतंच या दोघांना मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाबाहेर पाहिलं गेलं. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच सीमाने मोठं पाऊल उचललं आहे.

Sohali Khan Divorce: घटस्फोटाआधीच सोहैल खानच्या पत्नीचं मोठ पाऊल,  'खान' आडनाव काढलं
सोहैल आणि सीमा
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 2:59 PM

फॅशन डिझायरन सीमा खान (Seema Khan) आणि अभिनेता सोहैल खान (Sohail Khan) यांच्या घटस्फोटाची (Divorce) कलाविश्वात जोरदार चर्चा आहे. जवळपास 24 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीमा आणि सोहैल वेगवेगळे राहतायत. नुकतंच या दोघांना मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाबाहेर पाहिलं गेलं. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच सीमाने मोठं पाऊल उचललं आहे. सीमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील खान हे आडनाव काढून टाकलं आहे. या दोघांनी अद्याप अधिकृतपणे घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं नाही. सीमाने खान आडनाव काढून सीमा किरन सजदेह असं माहेरचं आडनाव लावलं आहे. सीमाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्टसुद्धा लिहिली आहे. ‘अखेर सर्वकाही जुळून येतं. ते कसं होतं हे जाणून घ्यायची तुम्हाला गरज नाही. पण ते नक्की होईल यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो’, असं तिने लिहिलंय.

1998 मध्ये ‘प्या किया तो डरना क्या’ या चित्रपटाच्या सेटवर सोहैल आणि सीमा पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सीमा आणि सोहैलला निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. या दोघांच्या घटस्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र सोहैल आणि सीमा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होते. हे दोघं गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे राहत होते. नेटफ्लिक्सच्या ‘बॉलिवूड वाइव्स’ या शोमध्ये तिने तसं स्पष्टदेखील केलं होतं. सोहैल आणि माझ्यात काहीच आलबेल नसल्याचंही तिने म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

“अनेकदा वेळेसोबत तुमचे नातेसंबंध बिघडू लागतात आणि ते वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करत नाही कारण आम्ही आनंदी आहोत आणि माझी मुलं खूश आहेत. सोहैल आणि मी एकत्र खूश नाही पण आम्ही एक कुटुंब म्हणून राहतोय. आमच्यासाठी मुलांचा आनंद महत्त्वाच आहे,” असं ती म्हणाली होती. सोहैल आणि सीमा यांचाही संसार मोडू नये म्हणून सलमानचे प्रयत्न केल्याचं समजतंय. मात्र घटस्फोट घेण्याबाबत हे दोघं ठाम आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.