मुंबई : अयान मुखर्जीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) अवघ्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाविषयी नवनवीन अपडेट पुढे येत असून चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते आहे. कारण बाॅलिवूडची (Bollywood) प्रसिध्द जोडी रणवीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातूनसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शिवाय बिग बी देखील या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. नुकतेच या चित्रपटाचा आणखीन एक टीझर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) देखील दिसणार आहे. मौनी रॉयने शाहरुख खान चित्रपटात असल्याचे काही संकेत दिले आहेत.
ब्रह्मास्त्र चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट बनवायला खूप वेळ आणि पैसा लागलायं. लोकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले आहेत. अलीकडेच चाहत्यांनी असा दावा केला होता की त्यांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख खानला पाहिले आहे. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने यासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही किंवा आलिया भट्ट आणि रणवीर कपूरनेही याबद्दलचे काही भाष्य केले नाहीयं. मात्र, याबद्दलचे संकेत मौनी रॉयने दिले आहेत
अयान मुखर्जीच्या या चित्रपटात मौनी रॉय विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर चाहत्यांना हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे की, शाहरुख खान खरोखरच या प्रोजेक्टचा भाग आहे का? या चित्रपटात तो कॅमिओ करताना दिसणार आहे का? या चित्रपटाशी संबंधित एका क्लिपने सर्वांनाच चकित केले. मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळण्याची शक्यता आहे की, यामध्ये शाहरुख खान आहे की नाही.