Shahrukh Khan Corona Positive : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला कोरोनाची लागण

Shahrukh Khan Corona Positive : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Shahrukh Khan Corona Positive : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 6:32 PM

मुंबई : सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सार्वजनकि ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अश्यात बॉलिवूडला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलंय, असं म्हणता येईल. एका पाठोपाठ एका सेलिब्रिटीला कोरोनाची लागण होतेय. आता बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला (Shahrukh Khan) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19) आली आहे.

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा

सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. अश्यात अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक आर्यन , कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर यांना कोरोना झाला आहे.

पार्टी एक अन् कोरोनाला आमंत्रण

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नुकताच आपला 50वा वाढदिवस साजरा केला. मुंबईतील अंधेरी इथल्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये त्याने जंगी बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर, सैफ अली खान यांसारखे बॉलिवूडमधील असंख्य कलाकार उपस्थित होते. यात बर्थडे पार्टीतील जवळपास 50 ते 55 सेलिब्रिटींना कोरोनाचीलागण झाल्याचं कळतंय. ‘बॉलिवूड हंगामा’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “पार्टीनंतर फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहरच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना कोविडची लागण झाली आहे. काही कलाकार याबद्दलची माहिती उघड करत नाही आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनलाही कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक आर्यन ज्या अभिनेत्रीसोबत मिळून चित्रपटाचं प्रमोशन करत होता, ती अभिनेत्री करणच्या पार्टीला हजर होती”, अशी माहिती सूत्रांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिली.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona)लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजी करण्याचे काही कारण नाही. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये (Home isolation)असून, घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या जे संपर्कात आले आहेत, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांचा देखील दुसऱ्यांदा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.