शंकर महादेवन यांच्या ‘ब्रेथलेस’चा मजेशीर किस्सा; “जावेद अख्तरांची ती दोन पानं वाचली अन्..”

'ब्रेथलेस' (Breathless) हा त्यांचा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. याच 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या अल्बममुळे ते प्रकाशझोतात आले. नावाप्रमाणेच त्यांनी हे गाणं एका श्वासात गायलं होतं.

शंकर महादेवन यांच्या 'ब्रेथलेस'चा मजेशीर किस्सा; जावेद अख्तरांची ती दोन पानं वाचली अन्..
Shankar Mahadevan Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 7:30 AM

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी आजवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते शंकर महादेवन यांच्या करिअरची सुरुवात मात्र चित्रपटांची गाणी रेकॉर्ड करणं, जाहिरातींसाठी जिंगल्स तयार करणं इथपासून झाली. आज ते बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक आहेत. ‘ब्रेथलेस’ (Breathless) हा त्यांचा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. याच 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या अल्बममुळे ते प्रकाशझोतात आले. नावाप्रमाणेच त्यांनी हे गाणं एका श्वासात गायलं होतं. याआधी तसा प्रयोग कोणत्या गायक किंवा संगीतकाराने केला नव्हता. एका मुलाखतीत त्यांनी या गाण्याचा मजेशीर किस्सा सांगितला. कामावरून नवी मुंबईला घरी जात असताना टॅक्सीमध्ये त्यांनी ‘ब्रेथलेस’ हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. (Shankar Mahadevan Birthday Special)

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत शंकर महादेवन म्हणाले, “त्यावेळी मी जाहिरातींच्या जिंगल्सवर काम करत होतो, विविध ठिकाणी परफॉर्मसुद्धा करत होतो. अनेकांनी मला त्यावेळी नॉन-फिल्म अल्बम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र रेकॉर्डिंगमध्ये मी व्यग्र असायचो. असंच एकेदिवशी मला जावेद अख्तर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. कोणत्या अल्बमवर काम करावं, असा विचार आम्ही दोघं करत होतो. जावेद साहेबांच्या डोक्यात एक कल्पना होती आणि त्यांनी ती मला सांगितली. मुखडा, संगीत, अंतरा आणि पुन्हा संगीत अशा प्रकाराचं गाणं त्यांनी मला सुचवलं. एका विशिष्ट पद्धतीची रचना त्यात नव्हती. पण रचना नसतानाही ते खास होतं. या कल्पनेनंच मी खूप उत्सुक झालो होतो. एका श्वासात हे गाणं म्हणावं, असा निर्णय आम्ही दोघांनी घेतला. जवळपास आठवडाभरानंतर त्यांनी मला दोन पानं लिहून दिली. जेव्हा मी ते पहिल्यांदा वाचलं, तेव्हा मला ते एखाद्या बातमीसारखं वाटलं. हे नेमकं काय आहे, मला कळत नव्हतं. तेव्हा जावेद साहेब म्हणाले, हे ब्रेथलेस आहे.”

‘ब्रेथलेस’ हे गाणं संगीतबद्ध कसं केलं हे सांगताना ते पुढे म्हणाले, “त्यावेळी मी नवी मुंबईला राहायचो. एकेदिवशी जेव्हा मी कामावरून घरी जात होतो. तेव्हा टॅक्सीमध्ये मी डिक्टाफोनच्या आधारे गाणं संगीतबद्ध करायचा प्रयत्न करत होतो. घरी पोहोचेपर्यंत ते गाणं संगीतबद्ध झालं होतं आणि अशा पद्धतीने ब्रेथलेस सर्वांच्या भेटीला आलं.” एहसान नूरानी आणि लॉय मेंडोन्सा यांच्यासोबत मिळून शंकर महादेवन यांनी अनेक अप्रतिम गाणी गायली आणि संगीतबद्ध केली.

हेही वाचा:

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

दिशा-टायगरचं ब्रेकअप? आता राहिली फक्त मैत्री? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

‘पावनखिंड’वर मोहन भागवतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा..”

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.