AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Kumar Death: दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!

जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं. (Actor Dilip Kumar)

Dilip Kumar Death: दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!
dilip kumar
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 11:02 AM

मुंबई: जेजुरीत दिलीप कुमार यांचं शुटिंग सुरू होतं. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत होते. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते, अशा शब्दात शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या. (sharad pawar Remembering the Tragedy King dilip kumar)

अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचं निधन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आपल्या मित्राच्या निधनाने शरद पवारही व्यथित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहिल्याचा जेजुरीतील किस्साही सांगितला. देशाने एक महानायक गमावला आहे. त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. जेजुरीत शुटिंग सुरू होतं. त्यावेळी आम्ही तरुण होतो. दिलीप कुमार यांची क्रेझ होती. शुटिंगची आम्हाला कुणकुण लागल्यावर आम्ही थेट सायकलवरून जेजुरी गाठली. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहिलं. नंतरच्या काळात विधिमंडळात राज्य सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिलीप कुमार आणि माझी मैत्री झाली. आमचं वेगळं नातं निर्माण झालं. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते माझा प्रचार करण्यासाठी एखाद दुसरी सभा घ्यायचे, असं पवार यांनी सांगितलं.

शेरीफ म्हणून चांगलं काम

मुंबईच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सहभाग असे. राजकारणातही त्यांचा सहभाग होता. म्हणून सरकारने त्यांना मुंबईचे शेरीफ केले होते. त्यावेळी त्यांनी शेरीफ म्हणून त्यांनी चांगलं काम केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. भारत चीन युद्ध, भारत-पाक युद्धा नंतर जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, जनमाणसात एकसंघत्व निर्माण करण्यासाठी दिलीप कुमार यांनी संरक्षण यंत्रणांना नेहमीच सहकार्य केलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशाबाहेरही लोकप्रिय

परदेशातही दिलीप कुमार लोकप्रिय होते. त्याची प्रचिती आम्हाला आली. आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती. इतके ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता भारतापुरतीच नव्हती, तर भारताबाहेरही ते लोकप्रिय होते, असं ते म्हणाले. अलिकडे दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना मी भेटून आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

कृतज्ञ राहणं हेच योग्य

दिलीप कुमार यांच्या जाण्याने कलेवर, त्यांच्यावर अस्था असलेल्या घटकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असेल. पण त्यांना जे काही आयुष्य मिळालं त्यात त्यांनी कलेची अखंड सेवा केली. त्याबद्दल आपण कृतज्ञ राहणं हेच योग्य होईल, असं ते म्हणाले. (sharad pawar Remembering the Tragedy King dilip kumar)

संबंधित बातम्या:

Dilipkumar Death | ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

Dilip Kumar Latest Photos : दिलीप कुमारांचे पार्थिव घराच्या दिशेने रवाना, सायंकाळी पार पडणार अंत्यविधी

Dilip Kumar Death | मोहम्मद युसुफ खान कसे बनले दिलीप कुमार? जाणून घ्या ‘या’ नावामागची कहाणी..

(sharad pawar Remembering the Tragedy King dilip kumar)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.