Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने वाराणसीमध्ये केली गंगा आरती, पाहा अभिनेत्रीचा खास व्हिडीओ
बऱ्याच वेळा व्यायाम करतानाचे व्हिडीओ शिल्पाचे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते. शिल्पा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. विविध फोटो आणि व्हिडीओ शिल्पा चाहत्यांसाठी शेअर करते. बऱ्याच वेळा व्यायाम करतानाचे व्हिडीओ शिल्पाचे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडलाय. इतकेच नाही तर चार ते पाच दिवसांपूर्वी राज कुंद्राने अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरोधात एक सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली होती.
View this post on Instagram
राज कुंद्राचे नाव अश्लील व्हिडीओ तयार करण्याच्या प्रकरणात आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या प्रकरणात शर्लिन चोप्रा हिने राज कुंद्रासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात देखील अत्यंत गंभीर आरोप केले होते. सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ वाराणसी येथील आहे.
शिल्पा शेट्टीने नुकतेच तिची आई सुनंदा शेट्टीसह वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात आशीर्वाद घेतले. गंगा नदीच्या काठावर प्रसिद्ध गंगा आरतीमध्येही शिल्पा शेट्टी सहभागी झाली होती. याचा व्हिडिओ शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीने जेवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये शिल्पा सतत खाताना दिसली होती.