Net Worth | तब्बल 14 वर्षानंतर शिल्पा शेट्टीचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, जाणून घ्या किती संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकत असते. बर्‍याच वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर ती मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Net Worth | तब्बल 14 वर्षानंतर शिल्पा शेट्टीचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, जाणून घ्या किती संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री...
शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 9:30 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकत असते. बर्‍याच वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर ती मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तिचा ‘हंगामा 2’ हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री असण्याबरोबरच शिल्पा निर्माती देखील आहे. तिचा प्रत्येक चित्रपट रिलीज होताच नवीन विक्रम करायचा.

आपल्या फिटनेस आणि नृत्यासाठी परिचित असलेल्या शिल्पा शेट्टीने ‘बाजीगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ज्यासाठी तिचे खूप कौतुक झाले. 2001मध्ये शिल्पाच्या या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली होती. चला तर, शिल्पा शेट्टीच्या एकूण नेट वर्थविषयी जाणून घेऊया…

कॅकनॉज डॉट कॉमच्या अहवालानुसार शिल्पा शेट्टी जवळपास 134 कोटींच्या मालमत्तेची मालकीण आहे. तिच्या कमाईचा मुख्य स्त्रोत ब्रँड एंडोर्समेंट आहे आणि आता लवकरच चित्रपटात देखील चमकणार आहे. ती तब्बल 14 वर्षांनी आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे, यामुळे येत्या काही वर्षांत तिची नेटवर्थ कैक टक्क्यांनी वाढू शकते. शिल्पाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

शिल्पा शेट्टीचे घर

शिल्पा शेट्टी आपल्या कुटूंबासह मुंबईतील लक्झरी घरात राहते. वृत्तानुसार या घराची किंमत जवळपास 24 कोटी रुपये आहे. इतकेच नाही, तर शिल्पाची देशात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे.

शिल्पा शेट्टीच्या लक्झरी कार

शिल्पा शेट्टीला लक्झरी वाहनांची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू आय 8, लॅम्बोर्गिनीसह अनेक महागड्या गाड्या आहेत.

माध्यम अहवालांनुसार शिल्पा शेट्टी एका ब्रँडच्या कामासाठी जवळपास 1 कोटी रुपये घेते. ती बर्‍याच ब्रँड्ससाठी काम करते. या ब्रँड्ससाठी काम करून शिल्पाचा नेट वर्थ लक्षणीय प्रमाणात वाढला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्या डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ होस्ट करताना दिसत आहेत. ती सध्या छोट्या पडद्यावर खूपच सक्रिय झाली आहे. परीक्षक म्हणून ती प्रेक्षकांना खूप आवडते. शिल्पा शेट्टीची कमबॅक फिल्म ‘हंगामा 2’ येत्या 23 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत परेश रावल, मीझान जाफरी आणि प्रणिता सुभाष महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. शिल्पा शेट्टी 14 वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

(Shilpa Shetty’s return to the big screen after 14 years know about her net worth)

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस सूनबाई दिसणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात?

तुम्हालाही अभिनय शिकायचाय? अक्षय कुमार देतोय सुवर्णसंधी, ‘खिलाडी’ने सुरु केले प्रोफेशनल मास्टर क्लास!

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.