Shraddha Kapoor | चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘कपूर’ घराण्यात लवकरच ऐकू येणार सनईचे सूर!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूपच व्यस्त आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार श्रद्धा कपूर सध्या रोहन श्रेष्ठला डेट करत आहे.

Shraddha Kapoor | चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘कपूर’ घराण्यात लवकरच ऐकू येणार सनईचे सूर!
श्रद्धा कपूर सध्या रोहन श्रेष्ठला डेट करत आहे.
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 12:40 PM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूपच व्यस्त आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार श्रद्धा कपूर सध्या रोहन श्रेष्ठला डेट करत आहे. पण अद्याप या जोडीने एकमेकांबद्दल किंवा या नात्याबद्दल कधीही उघडपणे चर्चा केलेली नाही. पण बर्‍याचदा या कपलने मुंबईत एकत्र वेळ घालवला आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी या जोडप्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरही खूप चर्चिली जात होती. अशा परिस्थितीत आता रोहन श्रेष्ठच्या वडिलांनी या जोडीच्या नात्यावर त्यांच्या चाहत्यांना खास हिंट दिली आहे (Shraddha Kapoor wedding bells soon boyfriend rohan’s father gives hints to fans).

एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी खास बातचीत करताना रोहनचे वडील राकेश श्रेष्ठ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ‘श्रद्धा-रोहन एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत, हे मला आतापर्यंत माहित होतं. महाविद्यालयीन काळापासून हे दोघे एकमेकांसोबत आहेत. श्रद्धाशिवाय जुहूमध्ये माझ्या मुलाचा दुसरा कोणी मित्र किंवा मैत्रीण नाही. पण, श्रद्धाचे बरेच मित्र आहेत. दोघेही आपल्या व्यावसायिक आयुष्यात चांगले काम करत आहेत. जर अशी काही गोष्ट असेल, तर मला त्याबद्दल नक्कीच माहिती झाले असते.’

माझा या नात्याला पाठींबा : राकेश श्रेष्ठ

श्रद्धा-रोहनच्या लग्नाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना रोहनचे वडील म्हणाले की, जर दोघांनाही एकमेकांची सोबत आवडत असेल आणि एकत्र राहायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. दोघेही सज्ञान आहेत आणि त्यांचा निर्णय काळजीपूर्वक घेतील. पण, जर तुम्ही माझे मत विचारात असाल, तर या नात्याला माझा काहीच आक्षेप नाही. जर दोघांनाही लग्न करायचं असेल, तर मी त्यांच्यासाठी सर्व काही आनंदाने करण्यास तयार आहे.’(Shraddha Kapoor wedding bells soon boyfriend rohan’s father gives hints to fans)

श्रद्धाचं बर्थडे सेलिब्रेशन!

(Shraddha Kapoor wedding bells soon boyfriend rohan’s father gives hints to fans)

खास मित्रासमवेत श्रद्धा मालदीवमध्ये!

सध्या श्रद्धा कपूर तिच्या या खास मित्रासमवेत मालदीव येथे चुलत भाऊ प्रियांक याच्या लग्नात उपस्थिती दर्शवत आहे. या लग्नातील श्रद्धा कपूरचे काही ‘खास’ फोटो देखील समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती रोहन श्रेष्ठ सोबत धमाल करताना दिसली होती. त्याचवेळी एका व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर रोहनसोबत डान्स करताना देखील दिसली होती. विशेष म्हणजे याच ठिकाणी श्रद्धाचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.

शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया

शक्ती कपूरला जेव्हा श्रद्धाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘श्रद्धाच्या लग्नाविषयी ज्या काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत, त्या फक्त अफवाच आहेत. पुढच्या 4-5 वर्षांनंतर श्रद्धा लग्नाचा विचार करू शकते. सध्या तिच्याकडे बरेच मोठे चित्रपट आहेत आणि तिला तिचे लक्ष या चित्रपटांवर केंद्रित करायचे आहे’. शक्ती कपूर यांनी श्रद्धाच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना म्हटले होते की, ‘रोहन एक चांगला मुलगा आहे. तो लहानपणापासूनच आमच्या घरी येत होता. श्रद्धाने मला त्यांच्या लग्नाविषयी काहीही सांगितले नाही. आणि ते दोघंही खूप चांगले मित्र आहेत.’

(Shraddha Kapoor wedding bells soon boyfriend rohan’s father gives hints to fans)

हेही वाचा :

Sooryavanshi | अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला मोठं ग्रहण! प्रेक्षकांना आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार?

Shreya Ghoshal | गोड गळ्याची गायिका श्रेया घोषालकडे ‘गुडन्यूज’, सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.