Happy Birthday Aditya Narayan : वयाच्या चौथ्या वर्षी आदित्यने गायले होते पहिले गाणे; गायक, अभिनेता, सूत्रसंचालक; जाणून घ्या आदित्य नारायणचा रंजक प्रवास

आदित्य हा एक उत्तम गायक तर आहेच पण तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्याने शाहरुख खान आणि सलमान खान यांसारख्या बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

Happy Birthday Aditya Narayan : वयाच्या चौथ्या वर्षी आदित्यने गायले होते पहिले गाणे; गायक, अभिनेता, सूत्रसंचालक; जाणून घ्या आदित्य नारायणचा रंजक प्रवास
Aditya NarayanImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 6:00 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध युवा गायक, अभिनेता आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण (Aditya Narayan) हे आज मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि दीपा नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याचा जन्म 6 ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत झाला. आदित्यला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. घरातील संगीतमय वातावरणामुळे त्यालाही लहानपणापासूनच संगीता (Music)ची आवड होती. आदित्यने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी गायला सुरुवात केली. आदित्य नारायणने पार्श्वगायक (Playback Singer) म्हणून 1992 मध्ये पहिल्यांदा गाणे गायले. तो ‘मोहिनी’ नावाचा नेपाळी चित्रपट होता. यानंतर 1995 मध्ये आदित्यने वडील उदित नारायण यांच्यासोबत ‘अकेले हम अकेले तुम’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणे गायले.

आदित्यने बड्या कलाकारांसह स्क्रिनही शेअर केलीय

आशा भोसले यांनी गायलेल्या ‘रंगीला’ या गाण्यात आदित्य नारायणने कॅमिओही केला होता. 1996 मध्ये आलेल्या ‘मासूम’ चित्रपटातील ‘छोटा बच्चा जान के…’ हे आदित्यचे सर्वात प्रसिद्ध गाणे आहे. या गाण्यासाठी आदित्यला बेस्ट चाइल्ड सिंगर क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला होता. आदित्यने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केले आहे. आदित्य हा एक उत्तम गायक तर आहेच पण तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्याने शाहरुख खान आणि सलमान खान यांसारख्या बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. परदेस आणि जब प्यार किसी से होता है, या चित्रपटांमधील आदित्यच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. आदित्य नारायणने 2009 मध्ये आलेल्या ‘शापित’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

आदित्यने अनेक शो होस्ट केले

आदित्यने टीव्ही शो होस्टमध्येही नशीब आजमावले आहे. आदित्यने 2007 मध्ये ‘सारेगामापा’ हा शो होस्ट केला होता, ज्याचे खूप कौतुक झाले होते. यानंतर त्याने एकामागून एक अनेक सिंगिंग रिअॅलिटी शो होस्ट केले. होस्ट म्हणून त्याने ‘खतरा..खतरा..खतरा..’, ‘किचन चॅम्पियन’, ‘एंटरटेनमेंट की रात’, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’, सा रे ग मा पा, इंडियन आयडॉल 12 सारखे शो देखील होस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

यावर्षी आदित्यला कन्यारत्न प्राप्त

आदित्यच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री श्वेता अग्रवालला दीर्घकाळ डेट केल्यानंतर 1 डिसेंबर 2020 रोजी त्याने लग्न केले. या वर्षी मार्चमध्ये आदित्य आणि श्वेता यांना कन्यारत्न झाले. त्विशा असे आदित्यच्या मुलीचे नाव आहे. आदित्य एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत सक्रिय असून सोशल मीडियावरही सक्रिय आहे. (Singer, actor to host, know Aditya Narayans Bollywood journey)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.