AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायिका नेहा भसिनच्या भावाने युक्रेनियन गर्लफ्रेंडशी केलं लग्न; युद्धामुळे तिने सोडला देश

'चाशनी', 'स्वॅग से स्वागत', 'जग घुमेया', 'कुछ खास है' यांसारखे सुपरहिट बॉलिवूड गाणी गाणारी प्रसिद्ध गायिका नेहा भसिनच्या (Neha Bhasin) भावाने नुकतंच युक्रेनियन (Ukraine) गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली. अनुभव भसिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

गायिका नेहा भसिनच्या भावाने युक्रेनियन गर्लफ्रेंडशी केलं लग्न; युद्धामुळे तिने सोडला देश
Neha Bhasin's brother weddingImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 12:17 PM

‘चाशनी’, ‘स्वॅग से स्वागत’, ‘जग घुमेया’, ‘कुछ खास है’ यांसारखे सुपरहिट बॉलिवूड गाणी गाणारी प्रसिद्ध गायिका नेहा भसिनच्या (Neha Bhasin) भावाने नुकतंच युक्रेनियन (Ukraine) गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली. अनुभव भसिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. ॲना होरोदेस्का असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव असून दिल्लीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अनुभवने लग्न केलं. ॲना ही मार्च महिन्यापर्यंत युक्रेनमधील कीव (Kyiv) शहरात राहत होती. रशिया-युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यानंतर 17 मार्च रोजी ती युक्रेन सोडून भारतात आली. गेल्या चार वर्षांपासून अनुभव आणि ॲना एकमेकांना डेट करत आहेत.

‘आमची पहिल्यांदा भेट झाल्यापासून ते आतापर्यंतचा हा प्रवास अनेक चढउतारांचा होता. आम्ही दोघांनी एकत्र प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि त्यातून मार्ग काढत इथपर्यंत आलो. तुझ्यासोबत मी माझ्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास फार उत्सुक आहे’, असं कॅप्शन देत अनुभवने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर नेहाने कमेंट करत लिहिलं, ‘लव्ह यू ॲना, अनु’. नेटकऱ्यांनीही या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. लग्नापूर्वीच्या विधींचेही काही फोटो अनुभवने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पहा लग्नाचे फोटो-

कीवमध्ये असताना ॲनाने ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत युद्धादरम्यान तिला आलेल्या अनुभवाविषयी व्यक्त झाली होती. “24 फेब्रुवारी रोजी मी बॉम्बच्या आवाजाने जागी झाले आणि माझ्या डोक्याच पहिला विचार हा आला की, मी स्वप्न पाहतेय का? जेव्हा मी अनुभव आणि इतरांचे मेसेज वाचले तेव्हा मला समजतं की रशियाकडून हल्ला करण्यात आला आहे”, असं तिने सांगितलं. युद्धाच्या पार्श्वभूमीवर ॲनाने भारतात येण्याचा निर्णय घेतला. 17 मार्च रोजी भारतात आल्यानंतर अनुभवने तिला लग्नासाठी प्रपोज केलं.

हेही वाचा:

“बॉलिवूड चित्रपट दक्षिणेत का चालत नाही?”; सलमानच्या प्रश्नाचं रामचरणने दिलं उत्तर

‘त्याने माझ्या पत्नीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला’; आयेशा टाकियाच्या पतीचा CISF अधिकाऱ्यावर आरोप

पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....