AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोहेल खानने ओलांडल्या धर्माच्या भिंती, सीमाशी आधी मंदिरात लग्न, मग पुन्हा निकाह

सोहेलने सीमा खानशी (Seema Khan) प्रेम विवाह केला आहे. तो ही अगदी पळून जाऊन! दोघांनीही आपल्या प्रेमाला नात्यात बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली. कारण दोघांच्या लग्नात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि तो अडथळा होता धर्माचा.

सोहेल खानने ओलांडल्या धर्माच्या भिंती, सीमाशी आधी मंदिरात लग्न, मग पुन्हा निकाह
सोहेल आणि सीमा खान
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 8:44 AM
Share

मुंबई : ‘दबंग’ सलमान खानचा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. सर्वांनाच सोहेलच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल माहिती आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे माहिती नाही. सोहेलने सीमा खानशी (Seema Khan) प्रेम विवाह केला आहे. तो ही अगदी पळून जाऊन! दोघांनीही आपल्या प्रेमाला नात्यात बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली. कारण दोघांच्या लग्नात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता आणि तो अडथळा होता धर्माचा. तथापि, दोघांनीही आपल्या प्रेमाच्या दरम्यान धर्माची भिंत आडवी येऊ दिली नाही (Sohail Khan and his wife Seema love story and their marriage story).

या व्यतिरिक्त आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या दोघांचे आधी मंदिरात लग्न झाले आणि त्यानंतर दोघांनीही पुन्हा इस्लाम धर्माप्रमाणे ‘निकाह’ केला होता. दोघांचे प्रेम जिंकले, पण या नात्यातही काही अडचणी आल्या. तथापि, या दोघांनी मिळून या अडचणींचा सामना केला आणि त्यांचे प्रेम संपुष्टात येऊ दिले नाही.

कशी झाली भेट?

चंकी पांडे यांच्या पार्टीत सोहेल खान आणि सीमा या दोघांची पहिली भेट झाली होती. या पार्टीत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि मग हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी एकमेकांना वरचेवर भेटण्यास सुरुवात केली आणि त्यांची रिलेशनशिप सुरु झाली. त्यानंतर सोहेल आणि सीमाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्ट्सनुसार, सीमाचे कुटुंबीय या नात्यावर राजी नव्हते आणि या दोघांनीही लग्न करावे, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी सीमाला सोहेलची भेट घेण्यापासून अडवले. यानंतर सोहेलने सीमाला तिच्या घरातून पळवून आणले. कारण सोहेलला आता सीमाबरोबर लवकरात लवकर लग्न करायचे होते.

या खास दिवशी लग्न

ज्या दिवशी सोहेलने सीमाशी लग्न केले होते, तो दिवस त्यांच्यासाठी खूप खास होता. कारण त्याच दिवशी त्यांचा ‘जब प्यार प्यार तो डरना क्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे सोहेलने निर्माता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दोघांनीही गुपचूप जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केले होते (Sohail Khan and his wife Seema love story and their marriage story).

लग्नानंतर केला ‘निकाह’

सोहेल सीमासमवेत त्यांच्या घरी आला, यावेळी दोघांच्या या निर्णयाबद्दल संपूर्ण कुटुंबाला माहिती नव्हती. सोहेल घरी पोहचला आणि त्याने त्यांचे वडील सलीम खान यांना दोघांच्या लग्नाविषयी सांगितले. त्यानंतर सलीम खानने दोघांचा निकाह लावून दिला आणि सीमाचा आपली सून म्हणून स्वीकार केला.

नातं टिकवून ठेवलं!

त्यादरम्यान, अशी बातमी आली की सोहेल अभिनेत्री हुमा कुरेशीला डेट करत आहे. दोघांच्या लिंकअपच्या बर्‍याच बातम्या व्हायरल झाल्या होत्या. असे म्हटले गेले होते की, यामुळे यामुळे सोहेल आणि सीमा यांच्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु, या दोघांनी नेहमीच या वृत्ताचे खंडन केले. इतकेच नाही तर, या अफवांमुळे सीमाने त्यांचे नातं कधीच तुटू दिलं नाही. दोघांनाही त्यांच्या प्रेमावर विश्वास होता.

कोण आहे सीमा?

सोहेलची पत्नी सीमा एक फॅशन डिझायनर आहे. तिचे स्वतःचे स्टोअर देखील आहे आणि त्याशिवाय तिच्याकडे काही ब्युटी सलूनची मालकी देखील आहे. दोघांच्या रिलेशनशिपची खास गोष्ट म्हणजे दोघेही एकमेकांच्या प्रोफेशनमध्येही एकमेकांना पूर्णपणे साथ देतात.

(Sohail Khan and his wife Seema love story and their marriage story)

हेही वाचा :

Shreya Ghoshal | श्रेया घोषालच्या बाळाचं नामकरण, त्रिकोणी कुटुंबाचा पहिला फोटोही शेअर

Sherni : विद्या बालनच्या ‘शेरनी’ गर्जना!, ट्रेलर आला; 18 जूनला होणार चित्रपट प्रदर्शित!

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.