Loudspeaker Row: राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर काय म्हणाला सोनू सूद?

भोंग्यांच्या वादावर आता अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) प्रतिक्रिया दिली आहे. "धर्म, जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे. देशात इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत," असं तो म्हणाला.

Loudspeaker Row: राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या मुद्द्यावर काय म्हणाला सोनू सूद?
Sonu Sood, Raj ThackerayImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 4:53 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी पुन्हा एकदा भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला. “एका दिवसापुरतं हे आंदोलन नाही. आमचं आंदोलन सुरूच राहणार. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे (LoudSpeakers) उतरवले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार,” असं सांगतानाच राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या डेसिबलचीही आठवण करून दिली. “सकाळच्या अजानपुरता हा विषय नाही. चार ते पाच वेळा बांग दिली जाते. ती जर त्यांनी परत दिली. तर आमचे लोकं हनुमान चालिसा त्या त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणारच,” असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. या सर्व वादावर आता अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) प्रतिक्रिया दिली आहे. “धर्म, जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे. देशात इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत,” असं तो म्हणाला.

काय म्हणाला सोनू सूद?

“धर्म, जात यातून बाहेर पडलो तरच देशाचा विकास होईल. देशातील जनतेनं एकत्र येणं महत्वाचं आहे. जी ताकद हनुमान चालीसामध्ये आहे तीच ताकद नमाजमध्येही आहे. हनुमान चालीसा जेवढी चांगली वाटते, तेवढंच नमाज ऐकण्यात चांगलं वाटतं. धर्म हा लोकांनी बनवलाय आणि यातून बाहेर पडण्याची आपल्याला फार गरज आहे. देशात अजूनही खूप मोठे मोठे मुद्दे आहेत. आपण यातच अडकून पडलो तर लोकांच्या अडचणी सुटणार नाहीत. आपण अगोदर याचा विचार करायला हवा. बाकीच्या गोष्टींना महत्व देण्याची गरज नाही,” असं तो म्हणाला.

“राजकारण्यांनी तळागाळातील सामान्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. लोकांना फरक पडत नाही की लाऊडस्पीकरवर काय सुरू आहे. लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया त्याने भोंग्यांच्या मुद्दयावर दिली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले राज ठाकरे?

“मशिदीवरील भोंगेच उतरवा. तुम्हाला प्रार्थना म्हणायचीये तर म्हणा. तुम्हाला लाऊडस्पीकर का लागतो? कुणाला ऐकवायची आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. निर्णय लागत नाही, तोपर्यंत असंच सुरू राहणार. सरकार म्हणते आम्ही आदेशाचं पालन करतो तर सर्व करा. सकाळी अजान झाली म्हणजे आम्ही खूश झालो असं अजिबात नाही. दिवसभरातील अजान भोंग्यावरून नको. तर हनुमान चालिसा चालूच राहणार,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.