Sonu Sood | सैनिकांसोबत सीमेवर थेट गस्त घालताना दिसला अभिनेता सोनू सूद
सोनू सूदमध्ये देशभक्ती मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. सोनू सूद हा राजस्थानमध्ये जाऊन सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेताना दिसत आहे.
मुंबई : सोनू सूद हा त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या दिलदारपणामुळे ओळखला जातो. कोरोनाच्या वाईट काळामध्ये सोनू सूद (Sonu Sood) याने लोकांची मदत केली. इतकेच नाहीतर अजूनही सोनू सूद हा लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतो. सोनू सूद याच्याकडे मदत मागणारा व्यक्ती कधीच रिकाम्या हाती परत नाही. काही दिवसांपूर्वी सोनू सूद याने upsc चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये क्लासेस सुरू केले होते. सोनू सूद याला लोक मसिहा म्हणून देखील ओळखतात. सोनू सूद हा सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतो. विशेष म्हणजे कोणी जर त्याला सोशल मीडियावर जरी मदत मागिलतली तरीही तो धावून येतो. लाॅकडाऊनच्या काळात लोकांच्या त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी सोनू सूद याने खास व्यवस्था देखील केली होती.
सोनू सूदमध्ये देशभक्ती मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. सोनू सूद हा राजस्थानमध्ये जाऊन सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेताना दिसत आहे. एनडीटीवीचा खास रिपोर्टमध्ये सोनू सूद सैनिकांसोबत जेवण करताना देखील दिसतोय.
राजस्थान सीमेवर सैनिक कशाप्रकारे गस्त घालतात आणि यावेळी नेमक्या काय समस्या येतात, हे जाणून घेताना सोनू सूद या व्हिडीओमध्ये दिसत आहे. इतकेच नाहीतर व्हिडीओमध्ये सोनू सूद हा लष्कराच्या जवानांसोबत उंटावर स्वार होताना देखील दिसत आहे.
राजस्थानमधील रेगिस्थानमध्ये सैनिक हे उंटावर बसून गस्त घालतात. मात्र, यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सोनू सूद हा व्हिडीओच्या शेवटी जवानांसोबत जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सोनू सूद याने धावत्या ट्रेनमध्ये स्टंट केला होता. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे सोनू सूद हा चर्चेत आला. मात्र, सोनू सूद याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता.
सोनू सूद याच्या या व्हिडीओवर जीआरपी मुंबईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही सोनू सूद याच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर यावर सोनू सूद याने जाहिरपणे माफी देखील मागितली होती.