Special Report | सोनम कपूर सावित्रीबाईंना ‘मदर ऑफ इंडियन फेमिनिझम’ का म्हणते?; वाचा स्पेशल स्टोरी

पहिल्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सोनमने सावित्रीबाईंचा गौरव केला होता.

Special Report | सोनम कपूर सावित्रीबाईंना 'मदर ऑफ इंडियन फेमिनिझम' का म्हणते?; वाचा स्पेशल स्टोरी
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 7:17 AM

मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. भारतीय स्त्रियांवर सावित्रीबाईंच्या (Special report Savitribai Phule mother of Indian feminism) कार्याचा सर्वाधिक पगडा असून त्यामुळेच महिला वर्ग आजच्या दिवशी त्यांना सॅल्युट करत असतो. प्रत्येक क्षेत्रात काम करणारी आजची महिला ही सावित्रीबाईंच्या खंबीर योगदानामुळेच उभी आहे. भारतात खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंनीच स्त्रीवादाची मुहूर्तमेढ रोव (Special report Savitribai Phule mother of Indian feminism).

अभिनेत्री सोनम कपूरने (Actress Sonam Kapoor) मागे एकदा तिच्या इन्टाग्रामवर सावित्रीबाईंवर एक पोस्ट लिहून सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेताना त्यांना ‘मदर ऑफ इंडियन फेमिनिझम’ संबोधलं होतं. पहिल्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सोनमने सावित्रीबाईंचा गौरव केला होता. यावेळी तिने सावित्रीबाईंविषयीच्या तिच्या भावना आणि तिच्यावर सावित्रीबाईंचा पडलेला प्रभाव यावरही भरभरून लिहिलं होतं. सावित्रीबाईंच्या जीवन कार्यामुळे मी प्रचंड प्रभावित झालेले आहे. सावित्रीबाईंविषयी मी वाचत असून माझ्या फॅन्सला त्याची माहिती देऊन सावित्रीबाईंचं कार्य समजावून घेण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचं सोनमने म्हटलं होतं.

सोनमने सावित्रीबाईंवर सात पानी पोस्ट लिहिली होती. त्यात तिने सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला आहे. स्त्री सक्षमीकरणापासून ते जातीव्यवस्थेविरुद्धच्या सावित्रीबाईंच्या लढ्याचाही त्यात समावेश होता. सावित्रीबाईंचा गौरव करण्यासाठी या पोस्टवर तिने एक नोटही लिहिली होती. सावित्रीबाईंच आयुष्य अत्यंत खडतर होतं. त्यांनी समाजिक गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या आणि 18 व्या शतकातील स्त्रीवादी चळवळीची पेरणी केली, असं सोनमने म्हटलं होतं.

शाळा सुरू करणं हे क्रांतीकारी धाडस

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू करणं हे त्याकाळातील क्रांतीकारी धाडस होतं. त्यांनी एक शाळेपासून 18 शाळा सुरू केल्या. दोन शिक्षण संस्था निर्माण केल्या. त्या काळात डॉक्युमेंटेशन एवढं केलं जात नव्हतं. पण तरीही अनेक दुर्मिळ दस्ताऐवज सापडले आहेत. त्यातून महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंच्या या शिक्षण संस्थेची माहिती, त्यांचे पदाधिकारी आणि अभ्यासक्रमाचा नेमका तपशील आढळून येतो, असं प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी सांगितलं (Special report Savitribai Phule mother of indian feminism).

सावित्रीबाईंविषयी

>> सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ला साताऱ्यातील नायगाव येथे झाला.

>> वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १८४०मध्ये त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.

>> सावित्रीबाईंनी घरीच शिकून नॉर्मल स्कूल, छबिलदासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडी आणि इतर विषयांची परीक्षा दिली.

>> त्यानंतर१८४५-४६ला तिसरी व १८४६-४७ला चौथी, नंतर दोन वर्षांचा कोर्स करून शिक्षकी पेशाचे ट्रेनिंग घेतले.

>> पुण्याच्या भिडेवाड्यात १८४८मध्ये भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले.

>> २८ जानेवारी १८५३ रोजी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं.

>> १८५४मध्ये ‘काव्यफुले’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.

>> सावित्रीबाईंनी यशवंतला दत्तक घेऊन त्याचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला.

>> सावित्रीबाईंचा ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह १८९१ला प्रसिद्ध झाला.

>> प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना प्लेगची लागण झाल्याने १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

Special report Savitribai Phule mother of Indian feminism

संबंधित बातम्या :

Sunday special story | 2020 मध्ये व्हायरल झालेले ‘हे’ व्हिडीओ पाहिलेत का?, बघा स्पेशल 10 व्हिडीओ

शनिवार विशेष : नव्या वर्षात तरी शेतीला दिवसा वीज मिळणार का? शेतकऱ्यांना दिलासा मिळेल?

शनिवार विशेष : ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.