Sukesh Chandrasekhar | मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर याच्या अडचणी वाढल्या, बाॅलिवूडच्या…
काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखर यांने नोरा फेतही हिचे दावे खोटे असल्याचे म्हटले होते. निक्की तांबोळी देखील सुकेश चंद्रशेखर याला भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती.
मुंबई : 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सध्या सुकेश चंद्रशेखर हा दिल्लीतील मंडोळी तुरुंगात आहे. विशेष म्हणजे या मनी लाँड्रिंग प्रकरणात काही बाॅलिवूड अभिनेत्रींचे नाव देखील आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. नोरा फतेही जॅकलीन फर्नांडिस यांचे नावही या प्रकरणात असून आतापर्यंत नोरा आणि जॅकलीन फर्नांडिस यांची अनेकदा चाैकशी देखील करण्यात आलीये. सतत या प्रकरणात वेगवेगळे खुलासे देखील होत आहेत. नेहमीच नोरा फतेही ही सांगते की, मी सुकेशला ओळखत नाही आणि त्याच्याकडून मला कोणतेही महागडे गिफ्ट वगैरे देण्यात आले नाहीये. मात्र, काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखर यांने नोरा फेतही हिचे दावे खोटे असल्याचे म्हटले होते. निक्की तांबोळी देखील सुकेश चंद्रशेखर याला भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती.
फक्त नोरा फतेही किंवा जॅकलीन फर्नांडिस याच नाही तर बाॅलिवूडच्या डजनभर अभिनेत्री या सुकेश चंद्रशेअर याला भेटण्याची थेट जेलमध्ये गेल्या होत्या. सातत्याने दावा केला जातोय की, जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबतच नोरा फतेही हिला देखील सुकेश चंद्रशेखर याने महागडे गिफ्ट दिले आहेत. मात्र, हे दावे खोटे असल्याचे कायमच नोरा म्हणते आलीये.
सुकेश चंद्रशेखर याच्या प्रेमामध्ये तर जॅकलीन फर्नांडिस इतकी जास्त आंधळी झाली होती की, तिला सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत लग्न देखील करायचे होते. मात्र, काही दिवसांपूर्वी जॅकलीन फर्नांडिस म्हणाली की, सुकेश कोणत्या मार्गाने पैसा कमावतो याची मला अजिबात काहीच कल्पना नव्हती.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात आता सुकेशच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण सुकेशच्या या प्रकरणात 3 दिवसांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आलीये. ईडीकडून सुकेश चंद्रशेखर याची चाैकशी केली जाणार आहे.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आता जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही यांच्यानंतर करीम मोरानी यांचेही नाव आल्याने मोठा धक्का बसला आहे. कारण करीम मोरानी हे बाॅलिवूडचे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत. या प्रकरणात त्यांचेही पाय खोलात असल्याचे बोलले जात आहे. करीम मोरानी यांना समन्स पाठवण्यात आलाय. ही काय पहिलीच वेळ नाहीये, यापूर्वीही करीम मोरानी हे मोठ्या वादामध्ये सापडले होते.