Athiya Shetty-KL Rahul: “अथियाचं के. एल. राहुलशी लग्न तेव्हाच होऊ शकेल जेव्हा..”, चर्चांवर अखेर सुनील शेट्टींनी सोडलं मौन

अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या 'तडप' या पदार्पणाच्या चित्रपटाच्या प्रीमिअरला के. एल. राहुलने हजेरी लावली होती. तेव्हापासूनच दोघांचं नातं 'ऑफिशिअल' झाल्याचं म्हटलं जातंय.

Athiya Shetty-KL Rahul: अथियाचं के. एल. राहुलशी लग्न तेव्हाच होऊ शकेल जेव्हा.., चर्चांवर अखेर सुनील शेट्टींनी सोडलं मौन
मुलीच्या लग्नाच्या चर्चांवर अखेर सुनील शेट्टींनी सोडलं मौनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 9:54 AM

अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के. एल. राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांवर आता अथियाचे वडील सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. के. एल. राहुलचं वेळापत्रक अत्यंत व्यग्र असल्याने जेव्हा त्याला मोकळा वेळ मिळेल तेव्हा दोघं लग्नगाठ बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मॅचेसदरम्यान मिळालेल्या फक्त दोन दिवसांच्या ब्रेकमध्ये लग्न होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून अथिया आणि के. एल. राहुल एकमेकांना डेट करत आहेत. इतकंच नव्हे तर लग्नापूर्वी दोघं लिव्ह-इनमध्ये राहणार असल्याचंही कळतंय.

काय म्हणाले सुनील शेट्टी?

एका पत्रकाराने सुनील शेट्टी यांना मुलीच्या लग्नाबद्दल विचारल तेव्हा ते म्हणाले, “मला वाटतं जेव्हा मुलं निश्चित करतील, तेव्हा लग्न होईल. राहुलचं वेळापत्रक खूप व्यग्र आहे. आता आशिय कप आहे, वर्ल्ड कप आहे, साऊथ आफ्रिका टूर आहे, ऑस्ट्रेलिया टूर आहे. जेव्हा मुलांना ब्रेक मिळेल तेव्हा ते लग्न करतील. एका दिवसात तर लग्न होऊ शकत नाही ना? मी वडील आहे म्हणून मला वाटतं की मुलीचं लग्न वेळेत व्हावं, मात्र जेव्हा राहुलला वेळ मिळेल तेव्हा ते दोघं मिळून त्याबाबत निर्णय घेतील. तुम्ही कॅलेंडर पाहिलात तर घाबरूनच जाल. फक्त एक-दोन दिवसांचा ब्रेक त्याला मिळतोय आणि दोन दिवसांत लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा प्लॅनिंग नक्की सुरू होईल.”

हे सुद्धा वाचा

अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या ‘तडप’ या पदार्पणाच्या चित्रपटाच्या प्रीमिअरला के. एल. राहुलने हजेरी लावली होती. तेव्हापासूनच दोघांचं नातं ‘ऑफिशिअल’ झाल्याचं म्हटलं जातंय. हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत जाहीर प्रेम व्यक्त करताना दिसतात.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.