AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSR Top 5 Movie | तो कधी ‘धोनी’ बनला, तर कधी ‘छिछोरे’, पाहा सुशांत सिंह राजपूतचे गाजलेले चित्रपट

टीव्ही कार्यक्रम ‘किस देश में है मेरा दिल’ मधील हर्षद चोप्राच्या भावाच्या भूमिकेत दिसलेल्या सुशांत सिंहला त्याची खरी ओळख ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. पण, जेव्हा अभिनेत्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन केले.

SSR Top 5 Movie | तो कधी ‘धोनी’ बनला, तर कधी ‘छिछोरे’, पाहा सुशांत सिंह राजपूतचे गाजलेले चित्रपट
सुशांत सिंह राजपूत
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 11:58 AM

मुंबई : गेल्या वर्षी म्हणजेच 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. हिंदी सिनेमाच्या एका उगवत्या तार्‍याने या जगाचा निरोप घेतला, यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता. सुशांतने आपल्या छोट्या कारकीर्दीत बर्‍याच मोठ्या चित्रपटांत काम केले, यामुळे तो नेहमी चाहत्यांमध्ये जिवंत राहील (Sushant Singh Rajput Death Anniversary SSR Top 5 Movie).

टीव्ही कार्यक्रम ‘किस देश में है मेरा दिल’ मधील हर्षद चोप्राच्या भावाच्या भूमिकेत दिसलेल्या सुशांत सिंहला त्याची खरी ओळख ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. पण, जेव्हा अभिनेत्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने पुन्हा चाहत्यांना वेड लावले. आज आम्ही तुम्हाला सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिनेत्याच्या पाच चित्रपटांचा परिचय करून देणार आहोत, जे चाहते कधीही विसरू शकत नाहीत…

एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी

‘एमएस धोनी… द अनटोल्ड स्टोरी’ हा सुशांतच्या कारकीर्दीतील सर्वात नेत्रदीपक चित्रपट होता. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MSDhoni) भूमिकेत दिसला होता. या चित्रपटासाठी सुशांतने खूप मेहनत घेतली होती. धोनीसारखे दिसण्यासाठी सुशांतने खऱ्या आयुष्यात क्रिकेटरचा लूक स्वीकारला. यासह, अभिनेत्याने क्रिकेटचे प्रशिक्षण देखील घेतले होते आणि अभिनेताने धोनीच्या हेलिकॉप्टर शॉर्टसाठी दिवसरात्र काम केले होते. हेच कारण होते की, जेव्हा चाहत्यांनी सुशांतला पडद्यावर पाहिले, तेव्हा त्यांना त्याला ओळखताच आले नाही.

राबता

‘राबता’ चित्रपटात जेव्हा सुशांत कृती सॅनॉनसोबत दिसला, तेव्हा चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडली. हा चित्रपट पुनर्जन्म आणि कधीही न संपणार्‍या प्रेमाची कहाणी होता. सुशांत आणि कृतीच्या चाहत्यांना शिव आणि सायरा खूप आवडले. या चित्रपटातही सुशांत दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला होता. सुशांतच्या लूक आणि चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी’ या चित्रपटाने सुशांतने सर्वांनाच चकित केले. या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात सुशांतच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. सुशांतने चित्रपटामध्ये बरेच गेटअप्स घेतले होते. या चित्रपटाच्या पुढच्या भागावर चर्चा सुरू होती, पण आता सुशांतच्या निघून गेल्यानंतर ही गोष्ट इथेच संपली आहे.

सोनचिडीया

सोनचिडिया या चित्रपटाने पडद्यावर फारशी कमाई केली नाही. परंतु, डाकू बनलेल्या सुशांतने चाहत्यांची मने निश्चितपणे जिंकली. मनोज बाजपेयी, भूमि पेडणेकर, रणबीर शोरे या कलाकारांसमवेत सुशांतने आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. पहिल्यांदाच सुशांतने अशा भूमिकेत चाहत्यांची भेट घेतली होती. सुशांतनेही या चित्रपटासाठी खूप परिश्रम घेतले होते.

छिछोरे

सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा स्टारर फिल्म ‘छिछोरे’ चित्रपट चाहते कधीही विसरणार नाहीत. हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटातही सुशांतने त्याच्या लूकवर प्रयोगही केले होते. या चित्रपटात सुशांत एका वयस्क व्यक्तीच्या भूमिकेतसुद्धा दिसला होता.

याशिवाय ‘केदारनाथ’ आणि ‘दिल बेचरा’ हे सुशांतच्या कारकीर्दीतील खूप चांगले चित्रपट होते.

(Sushant Singh Rajput Death Anniversary SSR Top 5 Movie)

हेही वाचा :

Photo : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘या’ कलाकारांनी स्वत:वर घेतली खास मेहनत, कपिल शर्मा शोमधील कलाकारांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहाच

Video | Indian Idol 12च्या मंचावर राखी सावंतची तुफान ‘लावणी’, ‘ड्रामा क्वीन’चा डान्स पाहून चाहते म्हणतात…

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.