Hera Pheri | टी सीरीजने थेट हेरा फेरीच्या फ्रँचायझीला पाठवली नोटीस, वाद वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हेरा फेरी 3 या चित्रपटाला अक्षय कुमार याने होकार दिलाय. एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार देण्याचे थेट कारण सांगून टाकले होते. त्यानंतर त्याने चित्रपटाला होकार दिला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी (Hera Pheri) 3 हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंग याचवर्षी केली जाणार आहे. या चित्रपटाबद्दल सतत काही अपडेट पुढे येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार (Akshay Kumar) याने नकार दिला होता. इतकेच नाहीतर त्याने थेट एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रीप्ट मला अजिबात आवडली नाहीये. यामुळे मी चित्रपटाला नकार दिलाय. यानंतर अक्षय कुमार याच्यावर चित्रपट निर्माते नाराज झाले. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू होती.
अक्षय कुमार याच्यासोबतच कार्तिक आर्यन याच्याही संपर्काच चित्रपट निर्माते होते. मात्र, हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार हा दिसणार नसल्याचे कळताच चाहते नाराज झाले. शेवटी अचानक अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला होकार दिला. विशेष म्हणजे आता या चित्रपटामध्ये फक्त अक्षय कुमार हाच नाहीतर बाॅलिवूडचा मोठा कलाकार धमाका करताना दिसणार आहे.
संजय दत्त हा देखील हेरा फेरी 3 मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये संजय दत्त म्हणाला की, मी हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये काम करण्यास इच्छुक आहे. या चित्रपटाची टिम जबरदस्त असल्याने यांच्यासोबत काम करण्यात मजा येईल. संजय दत्त हेरा फेरी 3 मध्ये दिसणार असल्याने त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.
आता हेरा फेरीबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. टी सीरीजने हेरा फेरी फ्रँचायझीला नोटीस पाठवली आहे. टी सीरीजने हेरा फेरी फ्रँचायझीच्या प्रत्येक गाण्याच्या सर्व ऑडिओ आणि व्हिज्युअल अधिकारांवर दावा केला आहे. नोटीसमध्ये कंपनीने फ्रँचायझी चित्रपटाच्या सर्व संगीत आणि ऑडिओ व्हिज्युअल गाण्याचे हक्काचे सर्व कॉपीराइटचे एकमेव हक्क धारक म्हणून घोषित केले आहे.
टी सीरीजच्या या नोटीसीमुळे हेरा फेरी फ्रँचायझीच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. आता यावर हेरा फेरी फ्रँचायझी काय उत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते सतत हेरा फेरी 3 चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. यामुळे आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा रिलीज झालेला सेल्फी हा फ्लाॅप गेलाय.