Thalapathy Vijay | थलापती विजयने आई-वडिलांविरोधात दाखल केली तक्रार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) दक्षिण इंडस्ट्रीचा एक मोठा सुपरस्टार आहे. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. चाहत्यांना विजयची शैली, संवाद वितरण आणि त्याचा हटके अंदाज खूप आवडतो. विजयच्या चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आता विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण याचे कारण काही वेगळेच आहे.

Thalapathy Vijay | थलापती विजयने आई-वडिलांविरोधात दाखल केली तक्रार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Thalapathy Vijay
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 2:05 PM

मुंबई : अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) दक्षिण इंडस्ट्रीचा एक मोठा सुपरस्टार आहे. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. चाहत्यांना विजयची शैली, संवाद वितरण आणि त्याचा हटके अंदाज खूप आवडतो. विजयच्या चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आता विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण याचे कारण काही वेगळेच आहे. खरे तर विजयने स्वतःच्याच पालकांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर, थलापती विजयने त्यांच्यासह आणखी 11 लोकांविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

खरं तर, विजयचे वडील आणि संचालक सुरेश चंद्रशेखर यांनी काही काळापूर्वी राजकीय पक्ष सुरू केला होता. या पक्षाचे नाव होते अखिल भारतीय थालापती विजय मक्कल इयक्ककम. असे सांगितले जात आहे की, निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये विजयच्या वडिलांचे नाव या निवडणूक पक्षाचे सरचिटणीस म्हणून आहे, तर त्याची आई शोभा चंद्रशेखर या पक्षाच्या कोषाध्यक्ष आहेत.

माझे नाव पाहून पक्षात जाऊ नका!

आता प्रकरण असे आहे की, काही काळापूर्वी विजयने आपल्या निवेदनात म्हटले होते की, त्याचा या निवडणूक पक्षाशी कोणताही संबंध नाही. विजयने आपल्या वक्तव्यात चाहत्यांना फक्त त्याचे नाव पाहून या पार्टीत सामील न होण्याचे आवाहन केले होते. विजयने असेही म्हटले होते की, जर कोणी त्याचे नाव, त्याचा फोटो किंवा फॅन क्लब वापरत असेल, तर तो त्यांच्यावर गुन्हा दाखल करेल. मात्र, सदर प्रकार घडल्याने अभिनेत्याने त्याच्या पालकांसह 11 लोकांविरोधात मद्रास उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

विजयची कारकीर्द

विजयच्या फिल्मी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. विजयचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट ‘नलय थेरपू’ होता. हा चित्रपट 1992 मध्ये आला. जेव्हा त्याने या चित्रपटात काम केले तेव्हा तो फक्त 18 वर्षांचा होता. यानंतर त्यांनी दक्षिण सिनेमाच्या एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

लक्झरी कारची आवड!

अभिनेता थलापती विजय हा दक्षिण चित्रपटातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याने आतापर्यंत साऊथ सिनेमात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने ‘मास्टर’, ‘सरकार’, ‘थुपाक्की’, ‘जिल्हा’, ‘बीस्ट’ अशा अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला. विजय अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चर्चेत असला, तरी काही काळापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विजयवर आरोप आहे की, त्याने 2012 मध्ये लंडनहून लक्झरी कार मागवली होती, त्याने त्या कारचा कर भरला नाही, यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला होता.

सुपरस्टार विजयला अभिनयाव्यतिरिक्त आलिशान वाहने खरेदी करण्याचाही शौक आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारची आलिशान वाहने आहेत. त्याच्या प्रत्येक कारची किंमत तब्बल लाख आणि कोटींमध्ये आहे. त्याचे गाड्यांवरील प्रेम इतके आहे की, तो वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या कार वापरतो. विजयची ही शाही शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडते आहे.

हेही वाचा :

Sonu Sood IT Raid | बिहारच्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यात 960 कोटी रुपये ट्रान्स्फर! सोनू सूद प्रकरणाशी कनेक्शन?

Anupam Shyam Birth Anniversary | ‘ठाकूर सज्जन सिंह’ची भूमिका साकारून अमर झाले अनुपम श्याम, वाचा त्यांचा अभिनय प्रवास…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.