AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःच्या वाढदिवशी अभिनेत्याने गमावले संपूर्ण कुटुंब, वडिलांनीच घातल्या होत्या गोळ्या!

1993 मध्ये आलेल्या रंग चित्रपटातील 'तुझे ना देखून तो चैन' हे गाणे आजही लोकांच्या जिभेवर आहे. या गाण्याच्या सुंदर ओळी आणि चित्रित केलेल्या दिव्या भारती आणि कमल सदना (Kamal Sadnah) या जोडीवर... अभिनेता कमल सदना त्या काळात मोठ्या अभिनेत्रींसोबत काम करून खूप प्रसिद्ध झाले होते.

स्वतःच्या वाढदिवशी अभिनेत्याने गमावले संपूर्ण कुटुंब, वडिलांनीच घातल्या होत्या गोळ्या!
Kamal Sadnah
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 9:49 AM

मुंबई : 1993 मध्ये आलेल्या रंग चित्रपटातील ‘तुझे ना देखून तो चैन’ हे गाणे आजही लोकांच्या जिभेवर आहे. या गाण्याच्या सुंदर ओळी आणि चित्रित केलेल्या दिव्या भारती आणि कमल सदना (Kamal Sadnah) या जोडीवर… अभिनेता कमल सदना त्या काळात मोठ्या अभिनेत्रींसोबत काम करून खूप प्रसिद्ध झाले होते. मात्र, आज त्यांचे नाव कुठेतरी मागे पडले आहे. खरं तर, त्याच्या अभिनयाची जादू पडद्यावर काही खास दिसू शकली नाही आणि आयुष्यानेही त्याच्याकडून प्रत्येक आधार काढून घेतला.

वाढदिवस हा कोणासाठीही वर्षातील सर्वात मोठा दिवस असला, तरी अभिनेता कमलसाठी तो काळा दिवस होता. कमलच्या 20व्या वाढदिवशी त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. एक अशी घटना घडली ज्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला एकाच वेळी संपवले.

काजोलसोबत पदार्पण

1992 मध्ये आलेल्या ‘बेखुदी’ या सिनेमातून काजोलसोबत नायक म्हणून पदार्पण करणारा कमल सदना आता अज्ञात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला, तरी काजोलसाठी या चित्रपटाने अनेक मार्ग उघडले. कमल आपल्या फिल्मी करिअरकडे फारसे लक्ष देऊ शकला नाही आणि याचे कारण खूप वेदनादायक आहे. वास्तविक, 1990 मध्ये कमलच्या 20व्या वाढदिवशी, चित्रपटात येण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात अशा घटना घडल्या, ज्या तो आयुष्यभर विसरणार नाही.

काय घडले ‘त्या’ रात्री?

अभिनेत्याच्या 20व्या वाढदिवसा दिवशी त्याच्या वडिलांनी स्वतः त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती. खरं तर, 21 ऑक्टोबर 1990 रोजी कमल त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त होता. त्याचवेळी वडील ब्रिज सदना यांनी पत्नी सईदा खान आणि मुलगी नम्रता यांची गोळ्या झाडून हत्या केली. मुलगा कमलला पाहताच त्याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या.  मात्र, गोळी कानाला हात लागल्याने तो बाहेर आला आणि तो थोडक्यात बचावला. मुलगी आणि पत्नीची हत्या केल्यानंतर कमलच्या वडिलांनी स्वतःवर गोळी झाडली.

ब्रिज सदना हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी ‘दो भाई’, ‘ये रात फिर ना आएगी’, ‘उस्तादों के उस्ताद’, ‘व्हिक्टोरिया नंबर 203’, ‘प्रोफेसर प्यारेलाल’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख करत कमलने घरात पैशांची कमतरता नसल्याचे सांगितले होते. पप्पांनी असं का केलं, ते मला माहीत नाही, असं देखील अभिनेता म्हणाला.

अभिनेत्यावर झाला परिणाम

डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेचा परिणाम कमलवर खूप खोलवर झाला होता. या अपघातामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला आणि वर्षानुवर्षे या दुःखातून बाहेर पडू शकला नाही. या काळ्या रात्रीच्या प्रभावाने कमलला बराच काळ घाबरवले. नंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये हे उघड झाले की, ब्रिज सदनाचे पत्नीसोबत जमत नव्हते आणि त्यांच्यात दररोज भांडणे होत असत, त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी एके दिवशी आपले संपूर्ण कुटुंब संपवले.

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर कमल सदानाने मेकअप आर्टिस्ट लिसा जॉनसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले मुलगा अंगद आणि मुलगी लिया आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे राहू लागले. चित्रपटांमध्ये यश न मिळाल्यानंतर, 2014 मध्ये, कमलने चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनात हात आजमावला. याशिवाय तो काही टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे.

हेही वाचा :

Pooja Batra : आपल्या हॉट स्टाईलने सगळ्यांना वेड लावणाऱ्या पूजा बत्राचं मन आलं नवाब शाहवर, वाचा लव्हस्टोरी

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी काँग्रेसच्या वाटेवर, ‘मर्यादा लेकीन कब तक’ मालिकेतून मिळाली होती प्रसिद्धी!

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....