Liger | लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू, आतापर्यंत चित्रपटाने कमावले तब्बल इतके कोटी…
इतर रिलीज झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा विचार केला तर पाचव्या दिवशी लाइगरने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीयं. आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधनलाही लाइगरने मागे टाकले आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये जवळपास 16 कोटींची कमाई केलीयं
मुंबई : विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडेचा बहुचर्चिच चित्रपट लाइगर बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल करताना दिसतोयं. चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस उलटले आहेत आणि कमाईचा आकडा वाढतोयं. लाइगरला (Liger) पाचव्या दिवशी चांगली कमाई करता आलीयं. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाचव्या दिवशी ‘लाइगर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील (Box office) कमाई चांगली होती. हिंदी कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई केलीयं. हिंदीपेक्षाही दक्षिणात्य भागामध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली असून पाचव्या दिवशी तब्बल 3 ते 4 कोटी रुपये कमावले आहेत.
आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधनलाही लाइगरने मागे टाकले
इतर रिलीज झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा विचार केला तर पाचव्या दिवशी लाइगरने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीयं. आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधनलाही लाइगरने मागे टाकले आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये जवळपास 16 कोटींची कमाई केलीयं. त्याचबरोबर एकूण या चित्रपटाने जवळपास 60 कोटींची कमाई केलीयं.
लाइगर चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये झाला प्रदर्शित
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक लाइगर चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रसिध्द झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगले कलेक्शन केले. या वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड लाइगरने मोडले. या चित्रपटातून विजय देवरकोंडा याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालायं.