‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?
एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वसाधारणपणे किती कमाई करेल, याचा काही अंदाज आपण बांधू शकतो. पण ते अंदाज खरेच ठरतील असं नाही. अनेकदा चित्रपटाच्या बजेटवर, कलाकारांवर, प्रमोशनवर अमाप पैसा खर्च करूनसुद्धा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळत नाही. याउलट काही चित्रपट अत्यंत माफक बजेटमध्ये तयार करून, मोजकंच प्रमोशन करूनसुद्धा प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकून जातात.
एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वसाधारणपणे किती कमाई करेल, याचा काही अंदाज आपण बांधू शकतो. पण ते अंदाज खरेच ठरतील असं नाही. अनेकदा चित्रपटाच्या बजेटवर, कलाकारांवर, प्रमोशनवर अमाप पैसा खर्च करूनसुद्धा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळत नाही. याउलट काही चित्रपट अत्यंत माफक बजेटमध्ये तयार करून, मोजकंच प्रमोशन करूनसुद्धा प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकून जातात. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या दुसऱ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये मोडतो. या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची (Kashmiri Pandits) हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. पहिल्या दिवशी फक्त साडेतीन कोटी रुपये कमावणारा हा चित्रपट आठव्या दिवशी चक्क 100 कोटींचा टप्पा पार करतो. या आकड्यावरून आपल्याला चित्रपटाच्या जबरदस्त माऊथ पब्लिसिटीचा अंदाज येतो. प्रभासचा ‘राधेश्याम’, आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि आता अक्षयचा ‘बच्चन पांडे’ अशा मोठमोठ्या चित्रपटांकडून टक्कर असूनही ‘द काश्मीर फाईल्स’ने नवा विक्रम रचला आहे. बॉलिवूडमध्ये तब्बल 47 वर्षांनंतर असं काही घडत असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने म्हटलं आहे.
1975 मध्ये ‘जय संतोषी माँ’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटानेही असाच विक्रम रचला होता, असं तरणचं म्हणणं आहे. त्यावेळी ‘शोले’सारख्या मोठ्या चित्रपटाची टक्कर होती. तरीसुद्धा ‘जय संतोषी माँ’ने दणक्यात कमाई केली होती. याचीच पुनरावृत्ती आता 47 वर्षांनंतर ‘द काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने होताना दिसतेय.
तरण आदर्शने काय म्हटलं?
‘1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय संतोषी माँ’ने त्यावेळी इतिहास रचला होता. त्या इतिहासाचा मी साक्षी होतो. शोलेसारख्या तगड्या चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर टक्कर असतानाही या चित्रपटाने त्यावेळी इतिहास नव्याने लिहिला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता 47 वर्षांनंतर होतेय. द काश्मीर फाईल्ससुद्धा विक्रम मोडत, नवीन विक्रम रचत इतिहास घडवतोय’, अशा आशयाचं ट्विट तरणने केलंय.
I was witness to the unparalleled hysteria of #JaiSantoshiMaa in 1975… It faced a mighty opponent in #Sholay, yet rewrote HISTORY then. It’s happened the second time, after 47 years… #TheKashmirFiles is also creating HISTORY… Demolishing records, setting NEW BENCHMARKS. pic.twitter.com/yfabnNLyI4
— taran adarsh (@taran_adarsh) March 19, 2022
द काश्मीर फाईल्स हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी या चित्रपटाने सर्वाधिक 19.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच शुक्रवारी (18 मार्च) अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र त्याचाही परिणाम ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईवर झाला नाही. उलट द काश्मीर फाईल्समुळे अक्षयच्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाल्याचं पहायला मिळालं. ‘बच्चन पांडे’ने पहिल्या दिवशी फक्त 13 कोटी रुपये कमावले आहेत.
हेही वाचा:
Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज The Kashmir Filesच्या मदतीला धावून येतात..