‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा
द काश्मीर फाइल्सचे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना Y-दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे.
द काश्मीर फाइल्सचे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना Y-दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सीआरपीएफची सुरक्षा त्यांच्यासोबत असेल. ‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रदर्शनानंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट परसेप्शन रिपोर्टच्या आधारावर गृहमंत्रालयने विवेक यांना ही सुरक्षा दिली आहे. ते भारतात कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत CRPF चे जवान असतील. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठवडाभरातच 97.30 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटावरून दोन गट तयार झाले आहेत. एक गट या चित्रपटाचं समर्थन करतोय तर दुसरा गट या चित्रपटाविरोधात आहे.
Y दर्जाची सुरक्षा म्हणजे काय?
आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणेच्या विविध श्रेणी आहेत. एखाद्या व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन त्यादृष्टीने सरकार आणि पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. एखाद्याला कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरविली जावी यासंदर्भात गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे त्याचं मूल्यांकन केलं जातं. देशात झेड प्लस, झेट, व्हाय, आणि एक्स या चार सुरक्षाव्यवस्था आहेत. Y- दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत अग्निहोत्री यांना आठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षा पुरविली जाईल, ज्यात दोन कमांडो आणि पोलिस कर्मचारी असतात. भारतात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, व्हिव्हीआयपी, व्हीआयपी, खेळाडू, सेलिब्रिटी, राजकारणी, व्यावसायिक यांना गरजेनुसार संरक्षण दिलं जातं.
India is at war. But nobody is telling you. Not anymore. Pl watch the trailer of the most Brutally Honest story of Kashmir Genocide. Pl share ONLY if you like it. #TheKashmirFiles #RightToJustice https://t.co/xBpSNZVTnh
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 21, 2022
द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला अनेक राज्यात टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यात ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यात आला आहे. भाजप शासित राज्यात या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये तर भाजपसोबतच काँग्रेसच्या आमदारांनीही चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा:
The Kashmir Filesची आठवडाभराची कमाई; 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सहभागी