मुंबई : आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर यांचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट चांगलाच गाजला. रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाची प्रचंड चर्चा आणि क्रेझ बघायला मिळाली. मात्र प्रत्यक्ष चित्रपट रिलीज झाल्यानंतर फ्लॉप ठरला. आमिर आणि करिनाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची (Movie) आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, हे सर्व असूनही चित्रपट फ्लॉप ठरल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. चित्रपट फ्लॉप होण्यासाठी आमिर खानला जबाबदार धरले जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे की आमिर खानमुळेच चित्रपटाचे बॉक्स ऑफिस (Box office) कलेक्शन खूपच खराब झाले आणि चित्रपट फ्लॉप ठरला.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने वायकॉम 18 ने लाल सिंह चड्ढाच्या फ्लॉपचे खापर पूर्णपणे आमिर खानवर फोडले आहे. चित्रपट फ्लॉप फक्त आणि फक्त आमिर खानमुळे झाला आहे, असे म्हटले आहे. आमिरने चित्रपटात चांगले काम न केल्याचा आरोप करण्यात आलायं. आमिरने त्यांच्याशी चर्चा न करता अनेक निर्णय घेतले, असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लाल सिंह चड्ढाची निर्मिती वायकॉम 18 आणि आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने मिळून केलीयं. मात्र, प्रमोशनशी संबंधित सर्व निर्णय आमिर खानने घेतले आहेत. वायकॉम 18 या निर्णयांमध्ये सहभागी नव्हते असे देखील आता सांगितले जात आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की वायकॉम 18 ला शेवटच्या क्षणापर्यंत माहित नव्हते की आमिर खान कॉफी विथ करणमध्ये जाणार आहे. यासोबतच आमिरने यादरम्यान असे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले ज्याची कल्पना त्याने वायकॉम 18 अजिबात दिली नव्हते.