राज कुंद्रा चित्रविचित्र मास्क वापरून चेहरा का लपवतो? अखेर कारण आलं समोर

राज कुंद्राने सांगितलं मास्कने चेहरा झाकण्यामागचं नेमकं कारण

राज कुंद्रा चित्रविचित्र मास्क वापरून चेहरा का लपवतो? अखेर कारण आलं समोर
Raj Kundra Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 5:58 PM

मुंबई- पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगातून सुटल्यानंतर व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा बरेच दिवस माध्यमांसमोर आला नव्हता. पण जेव्हा तो माध्यमांसमोर आला, तेव्हा नेहमीच त्याने चित्रविचित्र मास्क वापरत चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. पॉर्नोग्राफी प्रकरणात कारवाई झाल्याने तो तोंड लपवतोय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. मात्र त्यामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे. खुद्द राज कुंद्रानेच मास्क वापरण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

‘तुझा चेहरा सर्वांसमोर आण आणि सत्याला सामोरं जा. तू जर काही चांगलं किंवा वाईट केलं असशील तर त्याची जबाबदारी घेण्याची हिंमत ठेव. लोक तू आहेस तसं तुझा स्वीकार करतील’, अशी कमेंट एका युजरने केली होती. त्यावर उत्तर देताना राजने मास्क मागे चेहरा लपवण्याचं कारण सांगितलं.

हे सुद्धा वाचा

‘मी लोकांपासून माझा चेहरा लपवत नाही. पण मला मीडियाने माझे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी ज्या मीडिया ट्रायलमधून गेलोय, त्यानंतर ही गोष्ट समजायला तुम्हाला कठीण जाणार नाही’, असं त्याने लिहिलं.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली. मी निर्दोष असून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा त्याने केला आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.