Tv9 Exclusive : पद्मिनी कोल्हापुरेंचे सेकंड इनिंगचे गाणेही लोकप्रिय, दिग्गजांच्या साथीने धमाका लेबलचे गाणे हिट!
पद्मिनी कोल्हापुरे आणि त्यांचा मुलगा प्रियांक शर्मा (Priyaank Sharma) यांचे म्युझिक लेबल 'धमाका रेकॉर्ड्स'चे पहिले गाणे आलेआहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांसारख्या अनेक कलाकारांसोबत पद्मिनी कोल्हापुरेंनीही या गाण्याला आपला आवाज दिला आहे.
मुंबई। एके काळची दिग्गज अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांना अभिनयासोबतच गाण्याची कलाही अवगत आहे. त्यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये गायन केलेले असले तरीही आता कारकीर्दीच्या सेकंड इनिंगमध्ये ‘हम हिंदुस्तानी’ (Hum Hindustani) गाण्याद्वारे त्या प्रथमच स्वतंत्र गायक म्हणून समोर आल्या आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे पद्मिनी कोल्हापुरे आणि त्यांचा मुलगा प्रियांक शर्मा (Priyaank Sharma) यांचे म्युझिक लेबल ‘धमाका रेकॉर्ड्स’चे पहिले गाणे आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांसारख्या अनेक कलाकारांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे.(Tv9 exclusive interview with Padmini Kolhapure on Hum Hindustani song release)
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या गाण्यात काही ओळी पद्मिनी कोल्हापुरेंनी गायल्या असून हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या गाण्याची कल्पना कशी सुचली, म्युझिक लेबल धमाकासाठी गाण्याची संधी आणखी कुणाला मिळेल, भविष्यातील प्रोजेक्ट याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे पद्मिनी कोल्हापुरेंनी खास चर्चेदरम्यान आम्हाला दिली.
प्रियांकच्या इच्छेखातर गाण्याला आवाज दिला
गाण्यात प्रत्यक्ष सहभागी कसे झालात, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “प्रियांकने या गाण्यात अनेक दिग्गजांना एकत्र आणले आहे. त्यामुळे गाण्यातील काही ओळी मीदेखील गायल्या पाहिजेत, अशी इच्छा त्याने व्यक्त केली, आणि मी होकार दिला.”
जुन्या चित्रपटांतील गीतांना पद्मिनींचा आवाज
पद्मिनी यांना लहानपणापासून गाण्याचा छंद होता. त्यांनी यादों की बारात, दुश्मन दोस्त ,किताब आणि द बर्निंग ट्रेनसारख्या चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यासोबतच गाणेही गायले आहे. तसेच विधाता, हम इंतजार करेंगे, सडक छाप यासारख्या चित्रपटांतही त्यांनी गाणे गायले आहे.
हम हिंदुस्तानी गाण्याला दिग्गज कसे जोडले गेले
पद्मिनी म्हणाल्या की, प्रियांककडे हे गाणे आले तेव्हा एवढ्या व्यापक प्रमाणावर ते रेकॉर्ड होईल, असे आम्हाला वाटले नव्हते. लता आणि आशा दीदी माझ्या आत्या लागतात. गाण्याला त्यांचा आवाज घ्यायची इच्छा प्रियांकने व्यक्त केली. पण अशाजी दोन वर्षांपासून लोणावळ्यात राहतात. त्यांचे इथे येणे कठीण आहे. लताजींना विचारल्यास त्यांनी तत्काळ होकार दिला. त्यानंतर अमिताभ बच्चनजींना विचारले आणि नंतर बाकीचे सगळे गायक जोडले गेले. सुदैवाने गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान कोणतेही अडथळे आले नाही आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे स्वातंत्र्यदिवसाच्या विकेंडवर आम्हाला ते रिलीज करता आले.
धमाका रेकॉर्ड्सद्वारे नव्या टॅलेंटला प्रोत्साहन
पद्मिनी भविष्यात एखाद्या अल्बममध्ये गाताना दिसतील का, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, अजून याबद्दल विचार केलेला नाही. पण धमाका रेकॉर्ड्सद्वारे नव्या टॅलेंटला प्रोत्साहन दिले जाईल. सध्या पद्मिनी कोल्हापुरे काही दिवसांनी एका वेब सीरीजमध्ये दिसतील. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणा-या या सीरीजमध्ये त्यांचा लूक एकदम वेगळा असेल.
संबंधित बातम्या-
Gauhar khan : गौहर खानचा हा खास लूक बघितला का?
‘शेरशाह’ पाहून कमल हासनही सिद्धार्थ-कियाराचे झाले फॅन, म्हणाले…
(Tv9 exclusive interview with Padmini Kolhapure on Hum Hindustani song release)