Lata Mangeshkar | 3 महिन्यांच्या तो कठीण काळ, जेव्हा लता मंगेशकर यांनी एकही गाणं रेकॉर्ड केलं नाही, कारण
Unforgettable Memories of Lata Mangeshkar : सकाळी जेव्हा लता मंगेशकर उठल्या तेव्हा त्यांना बरं वाटत नसल्याचं जाणवू लागलं. अंगात कणकण होतं. तब्बेत बरी वाटत नव्हती. पोटातून प्रचंड वेदना सुरु झाल्या होत्या.
लता मंगेशकर हे एक भारतीय संगीत क्षेत्रातलं सर्वोच्च शिखरावर असलेलं नाव. लता मंगेशकर (Memories of Lata Mangeshkar) यांनी अनेक दशकं गायकी क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व केलं. आपल्या मधुर स्वरांना, अत्यंत गोड गाण्यांनी त्यांनी आपली दखल घ्यायला प्रत्येकाला भाग पाडलं. अनेक दशकं आपल्या गाण्याचा रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असलेल्या लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरच्या ऐन उमेदीच्या काळातील तीन महिने गाण्याचं रेकॉर्डिंग (Lata Mangeshkar Song Recording) केलं नव्हतं. यावेळी लता मंगेशकर या प्रचंड आजारी होत्या. त्यांना तेव्हा तीन महिने गाणं रेकॉर्डिग करता आलं नव्हतं. ही गोष्ट आहे 1962सालची. याच वर्षी त्यांच्या प्रकृतीत अत्यंत बिघाड झाला होता. यामुळे लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनाही तेव्हा धक्का बसला होता. डॉक्टरांनी तेव्हा घरी जाऊन लता मंगेशकर यांच्यावर उपचार केले होते. इंदौरमध्ये जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी बॉलिवूडच (Lata Mangeshkar Bollywood Songs) नाही, तर सर्व प्रकारच्या रसिकांच्या मनावर आपल्या गोड गळ्यानं जादू केली होती. त्याच्या प्रकृती अस्वास्थामुळे तेव्हा तीन महिने त्यांना रेकॉर्डिंग करता न आल्यानं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता.
नेमकं काय झालं होतं?
बीस साल बाद, या नावाचा सिनेमा तेव्हा नुकताच येऊन गेला होता. या सिनेमाचं गाणं रेकॉर्ड करण्याआधीच लता मंगेशकर यांना अस्वस्थ वाटू लालं होतं. रेकॉर्डिंगची सगळी तयारी तेव्हा झाली होती. तेव्हा संगीत दिग्दर्शकर हेमंत कुमार या गाण्याची तयारी करुन रेकॉर्डिंगसाठी सज्ज होते. सगळंकाही रेडी करण्यात आलं होतं. लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी येणार, यासाठी सगळेजण प्रतीक्षा करत होते. पण लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी येऊ शकल्या नव्हत्या.
सकाळी जेव्हा लता मंगेशकर उठल्या तेव्हा त्यांना बरं वाटत नसल्याचं जाणवू लागलं. अंगात कणकण होतं. तब्बेत बरी वाटत नव्हती. पोटातून प्रचंड वेदना सुरु झाल्या होत्या. काही वेळ आराम करुन बरं वाटेल, असं त्यांना वाटलं. पण तसं झालं नाही. तब्बेत आणखीनच बिघडली. काही दिवस उलटले. तब्बेत अधिकच बिघडत गेली. अनाचक एकदा त्यांना उलटी झाली. अखेर डॉक्टरांना घरी उपचारासाठी बोलवण्यात आलं. लतादीदींना तपासल्यानंतर डॉक्टरही काळजीत पडले. लता मंगशेकर यांच्या खाण्यातून त्यांना अपचन झालं होतं. वाढलेल्या फुड पॉयझनिंगमुळे लता मंगेशकर यांची तब्बेत बिघडली होती. हे कळल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. कोण लतादीदींना विष देण्याता प्रयत्न करतंय, अशी शंका घेतली गेली.
उषा मंगेशकर यांनी ठरवून टाकलं…
यानंतर लतादीदींची धाकटी बहीण उषा मंगेशकर यांनी अखेर कठोर निर्णय घेतला. आपल्या मोठ्या बहिणीसाठी आता मीच जेवणं बनवेल, असं त्यांनी ठरवून टाकलं. यानंतर लता मंगेशकर बाहेरचं काहीही खात नव्हत्या. यानंतर त्यांना बरं व्हायला तब्बल तीन महिने लागलेत. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून तेव्हा गीतकार आणि शायर असलेले मजरुह सुल्तानपुरी यांनीही त्यांनी प्रचंड मदत केली. तो रोज संध्याकाळी सहा वाजता लतादीदींनी भेटण्यासाठी जात आणि त्यांना आपल्या कविता आणि शायरी ऐकवत.
तीन महिने सलग हा सिलसिला सुरु होता. यानंतर तीन महिन्यांनी अखेर ठणठणीत झाल्यानंतर लता मंगेशकर यांनी आपलं पहिलं गाणं पुन्हा रेकॉर्ड केलं. या गाण्याचं नाव होतं कही दीप जले कहीं दिल… सिनेमाचं नाव होतं बीस साल बाद. या सिनेमाचं तेव्हा संगीत दिग्दर्शन केलं होतं हेमंत कुमार यांनी! लता मंगेशकर यांच्याबद्दलचा हा किस्सा आजही अनेकांना माहीत नाही. पण तेव्हा लता मंगेशकर यांच्या तब्बेतीला घेऊन त्यांचे चाहते फारच चिंतातूर झाले होते.
संबंधित बातम्या :
कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्सा