Urvashi Rautela: ऋषभ पंतवरून उर्वशी पुन्हा नाराज; चाहत्यांना दिली सक्त ताकीद

बुधवारी उर्वशी मुंबईतल्या एका गणेशोत्सव मंडळात पोहोचली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनीही गर्दी केली. उर्वशी जेव्हा मंडळात पोहोचली, तेव्हा उपस्थितांनी अचानक ऋषभ पंतचं नाव घेतलं.

Urvashi Rautela: ऋषभ पंतवरून उर्वशी पुन्हा नाराज; चाहत्यांना दिली सक्त ताकीद
Rishabh Pant and Urvashi Rautela
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 7:25 PM

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशीचा विषय सोशल मीडियावर चांगलाच चघळला गेला. एकमेकांचं नाव न घेता टोला लगावल्यानंतर उर्वशी भारत-पाकिस्तानदरम्यानचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिची चर्चा झाली. आता नुकतीच एक अशी घटना घडली, ज्यामुळे उर्वशीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी उर्वशी मुंबईतल्या एका गणेशोत्सव मंडळात पोहोचली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनीही गर्दी केली. उर्वशी जेव्हा मंडळात पोहोचली, तेव्हा उपस्थितांनी अचानक ऋषभ पंतचं नाव घेतलं. उर्वशीला पाहण्यासाठी आलेले लोक ऋषभच्या नावाचा नारा देत होते. हे पाहून ती खूपच नाराज झाली. उर्वशी त्यावेळी काहीच बोलली नाही. मात्र नंतर इन्स्टा स्टोरीमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

उर्वशीने इन्स्टा स्टोरीमध्ये तिचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमधील लोक ऋषभ पंतचं नाव घेताना दिसत आहेत. ‘हे खरंच बंद होण्याची गरज आहे, नाहीतर..’ असं तिने या व्हिडीओवर लिहिलं आहे. उर्वशीला घडलेला प्रकार अजिबात आवडला नाही, हे स्पष्ट दिसून आलं.

उर्वशी-ऋषभ पंतचा वाद

ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न घेतला सूचित केलं होतं. त्यावर ऋषभनेही इन्स्टा स्टोरीमध्ये उर्वशीला उत्तर दिलं होतं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. त्यानंतर भडकलेल्या उर्वशीने लिहिलं, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा.’ एका मुलाखतीत उर्वशीने तिच्या दिल्लीतील शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. या मुलाखतीत तिने असा दावा केला होता की कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. ती म्हणाली, “आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीमध्ये आला होता आणि त्याला मला भेटायचं होतं. दहा तास झाले होते आणि मी झोपली होती. मी एकही कॉल अटेंड करू शकले नाही आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल दिसले आणि मला खूप वाईट वाटलं की कोणीतरी माझी वाट पाहत होतं आणि मी त्यांना भेटू शकले नाही. मी त्याला म्हणाले की मुंबईला गेल्यावर भेटू. आम्ही मुंबईत भेटलो पण पापाराझींमुळे खूप मोठा ड्रामा झाला.”

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.