AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे चित्रीकरण बंद, बॉलिवूडकर बाहेरगावी फिरायला, तर त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेला!

महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona Virus In Maharashtra) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यानंतर आता सर्वत्र कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यूमुळे चित्रपटांचे शूटिंग देखील बंद झाले आहे. आता अशा परिस्थितीत कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनही रिकाम्या उभ्या आहे.

कोरोनामुळे चित्रीकरण बंद, बॉलिवूडकर बाहेरगावी फिरायला, तर त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेला!
बॉलिवूड कलाकार
| Edited By: | Updated on: Apr 23, 2021 | 10:52 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या (Corona Virus In Maharashtra) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यानंतर आता सर्वत्र कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यूमुळे चित्रपटांचे शूटिंग देखील बंद झाले आहे. आता अशा परिस्थितीत कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनही रिकाम्या उभ्या आहे. त्यांचा वापर केला जात नाही, त्यामुळे या व्हॅनिटी व्हॅन्सचे मालक केतन रावळ (Ketan Rawal) यांनी या व्हॅन कोरोना काळात ड्युटी बजावत असलेल्या मुंबई पोलिसांना वापरण्यासाठी दिल्या आहेत. तब्बल अर्ध्या डझनहून अधिक व्हॅनिटी व्हॅन सध्या पोलीस सेवेत असल्याची माहिती आहे. यात रणवीर सिंगचा चित्रपट ‘सर्कस’, आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि अक्षय कुमारचा चित्रपट ‘रक्षाबंधन’च्या व्हॅन्सचा समावेश आहे (Vanity vans owner ketan rawal gives this vans to Mumbai police during corona pandemic).

या संदर्भात बोलताना केतन म्हणाले की, ‘आपल्यालाही मुंबई पोलिसांची सेवा करता यावी यासाठी आम्ही रोहित शेट्टीचा ‘सर्कस’, संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि आनंद एल राय यांच्या ‘रक्षाबंधन’साठी दिलेल्या व्हॅन सध्या पोलिसांना दिल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या सेवेसाठी मी बर्‍याच व्हॅनिटी व्हॅन दिल्या आहेत. मागील वर्षी, आम्ही कोरोना काळात ड्युटी बजावत असलेल्या महिलांना आराम करण्यासाठी, शौचालय वापरण्यासाठी या व्हॅन दिल्या होत्या. याशिवाय घरी जाण्यापूर्वी त्या तिथे कपडे बदलून फ्रेश देखील व्हायच्या.’.

मुंबईत कोरोनाचे वाढते प्रकरण पाहून अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना घरीच रहाण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर त्याने काही मदत स्त्रोतांची यादी देखील चाहत्यांसमवेत शेअर केली आहे. जेणेकरून जर एखाद्याला त्या गोष्टींची गरज असेल, तर त्यांना तेथून लगेच मदत मिळेल (Vanity vans owner ketan rawal gives this vans to Mumbai police during corona pandemic).

शूटिंग रद्द होताच सेलेब्स फिरस्तीला!

शूटिंग थांबल्यानंतर बरेचसे कलाकार देशाबाहेर फिरायला गेले आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत सुट्टीवर मालदीवला गेली आहे. दोघांनाही विमानतळावर एकत्र स्पॉट केले गेले होते. काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीर दोघेही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

अभिनेता रणवीर सिंह देखील काही दिवसांपूर्वी पत्नी दीपिका पदुकोणसोबत विमानतळावर दिसला होता. मात्र, ते दोघे कुठे गेले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर मालदीवमध्ये एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत.

त्याचवेळी बुधवारी (21 एप्रिल) संध्याकाळी वरुण धवन पत्नी नताशा दलालसमवेत व्हेकेशन ट्रीपसाठी रवाना झाले आहेत. या दोघांचे स्थान देखील अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच, वरुण अलीकडे आपला आगामी चित्रपट ‘भेडिया’चे चित्रीकरण संपवून परतला आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री कृती सेनॉन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मंगळवारी शूटिंग संपल्यानंतर दोघेही मुंबईला परतले आहेत. मुंबईत परत येताच वरुण नताशाबरोबर वेळ घालवण्यासाठी व्हेकेशन ट्रीपला निघून गेला आहे.

(Vanity vans owner ketan rawal gives this vans to Mumbai police during corona pandemic)

हेही वाचा :

PHOTO | घरीच राहून सोनाक्षी सिन्हाने घटवले वजन, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही झाले चकित!

Video | ‘देशावर संकट येताच ते बघा पळून चालले’, रातोरात न्यूयॉर्कला जाणारे शाहरुख खानचे कुटुंब नेटकऱ्यांकडून ट्रोल!

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.