AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

It’s Rumor | अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाची अफवा, उत्तरं देऊन थकलेल्या अभिनेत्रीला बंद करावा लागला फोन!

जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम (Tabassum) कोरोनाला पराभूत करून हॉस्पिटलमधून नुकत्याच घरी परतल्या आहेत. कोरोनामुळे त्या 9 दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या.

It’s Rumor | अभिनेत्री तबस्सुम यांच्या निधनाची अफवा, उत्तरं देऊन थकलेल्या अभिनेत्रीला बंद करावा लागला फोन!
तबस्सुम
| Updated on: Apr 24, 2021 | 3:05 PM
Share

मुंबई : जेष्ठ अभिनेत्री तबस्सुम (Tabassum) कोरोनाला पराभूत करून हॉस्पिटलमधून नुकत्याच घरी परतल्या आहेत. कोरोनामुळे त्या 9 दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत काही मोठ्या सेलिब्रिटीच्या निधनाच्या बातम्या येत आहेत, त्याच अनुषंगाने तबस्सुम यांच्या निधनाच्या अफवांनाही उधाण आले आहे. ज्यानंतर दुःखी झालेल्या त्यांच्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विचारपूस आणि सांत्वन करणारे इतके फोन केले की अस्वस्थ झालेल्या तबस्सुम यांना स्वतःचा फोन बंद करावा लागला (Veteran Actress Tabassum death rumors spread actress gives official statement).

त्यानंतर 76 वर्षांच्या तबस्सुम यान स्वतःच्या तब्येतीची बातमी जाहीर करण्यासाठी माध्यमात निवेदन द्यावे लागले. काल रात्रीपासून ही घटना सुरू झाली असून, तेव्हापासून त्यांचा मुलगा होशांग गोविलच्या फोनवर शेकडो मिस कॉल आले आहेत. काही कॉलचे उत्तर देण्यासाठी जेव्हा त्याने या क्रमांकांवर संपर्क साधला, तेव्हा लोकांनी त्याला त्याची आई तबस्सुम यांच्या निधनाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली. तर काही लोकांनी त्याला सांत्वनपार संदेशही दिले.

अनेक सेलिब्रिटींचेही फोन कॉल्स

एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना तबस्सुम यांनी सांगितले की, जॉनी लीव्हर, अमित बहल, सुदेश भोसले आणि उषा खन्ना यांनी त्यांच्या मुलाला फोन करून, घाबरतच तब्येतीची चौकशी केली. उषा खन्ना यांनी या अफवांना सत्य मानून, तबस्सुम यांची आठवण काढून फोनवरच रडण्यास सुरुवात केली होती.

त्यांचा मुलगा होशांग याने सकाळी 7.30 वाजता तबस्सुम यांना झोपेतून जागे केले आणि असे फोन येत असल्याचे सांगितले. लोक त्यांच्या मृत्यूबद्दल खूप अफवा पसरवत असल्याचे सांगितले. तबस्सुम म्हणाल्या की, हे ऐकून मी मनाशी गमतीने म्हटले की, चला आता माझे वय आणखी वाढेल (Veteran Actress Tabassum death rumors spread actress gives official statement).

पाहा तबस्सुम यांचे ट्विट

जॉनी लीव्हरने केला फोन

जॉनी लीव्हर यांनी तबस्सुम यांना केला आणि त्यांचा आवाज ऐकताच म्हणाले, दीदी तुम्ही? तर तबस्सुम यांनी उत्तर दिले, हो, दीदी एकदम ठीक आहे. रेडिओचा सुप्रसिद्ध होस्ट अमिन सयानी यांनीही त्यांना फोन केला आणि त्यांच्याबद्दल अशीच काही माहिती घेतली. तबस्सुमने प्रत्येकाला त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली.

यापूर्वी अल्झायमर झाल्याची अफवा

प्रसिद्ध टीव्ही शो ‘फूल खिल है गुलशन-गुलशन’सारखा तबस्सुम यांचा शो एका वेळी इतका लोकप्रिय झाला होता की, प्रत्येक आठवड्यात लोक त्यांचा कार्यक्रम टीव्हीवर येण्यापूर्वी तयार होऊन बसायचे. त्या त्यांच्या या शोमध्ये सेलिब्रिटींची मुलाखत घ्यायची आणि लोकांना त्यांच्या मजेदार गोष्टी ऐकून खूप आनंद व्हायचा.

सध्या देखील त्यांचा ‘तबस्सुम टॉकीज’ हा शो यूट्यूबचा सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम ठरला आहे. ज्याचे पाच लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. त्याच्या आधी त्यांना अल्झाइमर झाल्याची एक अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरली होती. मात्र, त्यांनी नेहमी स्वतः माध्यमांसमोर येत अशा अफवांचे खंडन केले होते.

(Veteran Actress Tabassum death rumors spread actress gives official statement)

हेही वाचा :

Rakhi Sawant | ‘आई शपथ माझं लग्न झालंय, पण….’, पतीसोबतच्या नात्यावर राखी सावंतचे पुन्हा मोठे वक्तव्य…  

‘लोकं अन्नासाठी भटकतायत आणि तुम्ही पैसे उधळताय!’, ‘व्हेकेशन मोड’वर असलेल्या बॉलिवूडकरांना नवाजुद्दीनने फटकारले!

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.